नवी दिल्ली : बँक कोणत्याही ग्राहकांच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर दंड वसूल करते. मात्र स्टेट बँकेमध्ये चार अशी खाती आहेत ज्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे बंधन नाही.
प्रधानमंत्री जन-धन खाते
प्रधानमंत्री जनधन खात्यात तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाहीये. या खातेधारकांना एक लाख रुपयांचा दुर्घटना विमा कव्हरही मिळते.
स्मॉल सेव्हिंग बँक अकाऊंट
एसबीआयच्या छोट्या बचत खात्यांमध्ये अधिकाधिक बॅलन्स ५० हजार रुपयांपर्यंत ठेवता येतो. इतर बचत खात्यांप्रमाणे यातील रकमेवर व्याज दिले जात नाही.
बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाऊंट
जर तुम्ही स्टेट बँकेत बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाऊंटमध्ये खाते खोलले असेल तर तुम्हाला त्या खात्यात मिनिमम बॅलनस ठेवण्याची आवश्यकता नाही.
कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंटमध्ये
कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंटमध्येही तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नसते. या खात्याद्वारे कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. या खातेधरक कर्मचाऱ्यांना बँकेच्या अन्य सुविधा तसेच इंटरनेट बँकिग आणि मोबाईल बँकिंग सुविधाही मोफत दिल्या जातात.