घोडेस्वारी करण्याऐवजी पठ्ठ्यानं थेट घोड्यालाच उचललं, पुढे असं झालं की...

एका तरुणानं चक्क घोडेस्वारी नाही तर स्वत:च्या पाठीवर घोड्याला उचलून नेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 7, 2021, 02:38 PM IST
घोडेस्वारी करण्याऐवजी पठ्ठ्यानं थेट घोड्यालाच उचललं, पुढे असं झालं की... title=

मुंबई: बऱ्याचवेळा आपण लग्नात घोड्यावरून किंवा उंचावरून येताना पाहिलं असेल. अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर बीडमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उंटावरून नवरदेवानं वरात काढण्यात आली आहे. 

उंच असो किंवा घोडा वरातीत नवरदेव त्यावर बसतो. काहींना तर घोडेस्वारीचा नाद असतो म्हणून घोड्यावर स्वार व्हायला आवडतं. तर एका तरुणानं चक्क घोड्यावरून रोज कामाला येण्याची परवानगीच बॉसकडे मागितली. पण आता एक अजब घटना समोर आली आहे. 

एका तरुणानं चक्क घोडेस्वारी नाही तर स्वत:च्या पाठीवर घोड्याला उचलून नेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे कसं शक्य आहे असा दोन मिनिटं प्रश्नही पडणं सहाजिक आहे. पण ही घटना खरी आहे आणि त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

दमित्री असं या तरुणाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. हा मूळचा युक्रेनचा रहिवासी असून त्यानं घोड्याला आपल्या पाठीवर घेतलं आहे. या तरुणाचं नाव जगातील सर्वात तगडा आणि शक्तीशाली लोकांमध्ये गणलं जातं.

एवढा भलामोठा घोडा उचलून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. त्या घोड्यानंही त्याला मोठी इजा केली नाही. त्याचा हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही त्याच्या व्हिडीओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.