भोपाळ : नवरा-बायकोमध्ये वाद होणे सहाजिक आहे. सगळ्याच जोडप्यांमध्ये हे वाद होत असतात. परंतु यातुन ते आपलं नातं टिकवण्यासाठी मार्ग काढताता आणि पुढे जातात. तर काही वाद हे घटस्फोटापर्यंत पोहोचतात. परंतु काही लोकं अशा वादामुळे आत्महत्येचं देखील पाऊल उचलताता. जे खरोखरच खूप चूकीचं आहे. अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली आहे. यामध्ये एका तरुणाने घरगुती वादामुळे आत्महत्या केली. एवढेच काय तर त्याने आत्महत्या करताना व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे. जे पाहूण संपूर्ण मध्यप्रदेश हादरुन गेलं आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादामुळे एका तरुणाने ट्रेनच्या रुळावरती आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर या युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर दोन तुकड्यांमध्ये आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने व्हिडीओमध्ये पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही केला आहे.
राकेश जाटव असे या तरुणाचे नाव आहे. जो पंपापूर येथील रहिवासी आहे. तरुणाचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दोघांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला, मात्र कारवाई न झाल्याने आणि पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडला.
राकेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये तो "मी माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करणार आहे. माझ्या पत्नीने माझा छळ केला आहे, ती ना मला सोडायला तयार आहे, ना माझ्यासोबत राहायला. ती मला कुठेही राहू देत नाहीये. मला काही झाले तर तिला अटक करा. आमचा खटला टी.टी. नगर पोलिस ठाण्यात 4 दिवसांपासून सुरू आहे. माझ्या मृत्यूचे कारण काय आहे हे टीआयला माहित आहे."
यानंतर तरुणाने आपल्या कुटुंबीयांना फोन लावला आणि त्यांच्याशी बोलत असतानाच तो रेल्वे रुळावर झोपला. ट्रेनने धडक दिल्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुणाला संशय होता की, त्याच्या पत्नीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत अफेअर होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.