Viral News : प्रेमी युगुलासोबत ग्रामस्थांनी अमानवी कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील गया जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सलैया या गावात एक प्रेमी युगुलाचं एकमेकांशी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरु होते. त्या दोघांना गावात लपूनछपून भेटायला आता आवडतं नव्हतं म्हणून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्या दोघांनी बुधवारी बलियारी देवीच्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लग्नाची बातमी गावकऱ्यांना लागली.
संतापलेला गावकरांनी त्या दोघांना मंदिरात लग्न करताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं. त्या दोघांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचे केस कापले, एवढंच नाही अर्धनग्न करुन त्यांना गाव सोडून जाण्याचे आदेश दिले. 19 वर्षीय मुलीसोबत गावकऱ्यांनी अमानवीय कृत्य केलं. या गावकऱ्यांनी मुलीच्या वडिलांनाही सोडलं नाही. गावात आल्यास वडिलांनीही शिक्षा देण्यात येईल असं सांगण्यात आले. (loving couple Villagers misbehaved miscreants cut hair half naked and beat them viral viral Bihar News)
या घटनेनंतर न्याय मागण्यासाठी प्रेमी युगुलाने पोलीस स्टेशनमध्ये या लोकांबद्दल तक्रार दाखल केली. त्याशिवाय त्यांनी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. पीडित जोडप्याची तक्रार आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तीन जणांना अटक केलं आहे. महेंद्र मांझी, प्रकाश भुईया आणि धनंजय कुमार यांचा समावेश आहे. दरम्यान पोलीस या घटनेची कसून चौकशी करत असून इतर लोकांचाही शोध सुरू आहे.