Bank holidays in December 2024 : येत्या महिन्यात अर्थात डिसेंबर 2024 मध्ये आपल्याला किती सुट्ट्या मिळणार आहेत त्याच्या यादीवर एक नजर टाकूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यां व्यतिरिक्त या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सगळ्या सरकारी आणि खासगी बॅंकांना एकूण 2 शनिवार आणि 5 रविवार अशा सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं डिसेंबर 2024 साठी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्य, स्पेशल सुट्ट्या, राष्ट्रीय सुट्ट्या आणि रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नियमित बंद यांचा समावेश आहे. त्यामुळे आता तुमची बॅंकेतील कामांचे नियोजन आताच करा.
या महिन्यात 31 दिवसात एकूण 17 दिवस बॅंक बंद असणार आहे. रिजर्व बॅंक ऑफ इंडियानं त्यांच्या वेबसाइटवर याविषयी सांगितलं होतं. महत्त्वाचं म्हणजे सगळ्या सुट्ट्या या वेगवेगळी राज्यानुसार वेगळ्या होतात.
1 डिसेंबर - रविवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
3 डिसेंबर - शुक्रवार - सेंट फ्रान्सिस जेवियर यांची पुण्यतिथी (गोवा)
8 डिसेंबर - रविवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
12 डिसेंबर - मंगळवार - पा-तोगन नेंगमिनजा संगमा यांची पुण्यतिथी (मेघालय)
14 डिसेंबर - दुसरा शनिवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
15 डिसेंबर - रविवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
18 डिसेंबर - बुधवार - यू सोसो थाम यांची पुण्यतिथी (मेघालय)
19 डिसेंबर - गुरुवार - गोवा लिब्रेशन डे (गोवा)
22 डिसेंबर - रविवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
24 डिसेंबर - मंगळवार - ख्रिसमसच्या आधीचा दिवस (मिझोराम, नागालॅन्ड आणि मेघालय)
25 डिसेंबर - बुधवार - ख्रिसमस (संपूर्ण भारतात सुट्टी)
26 डिसेंबर - गुरुवार - ख्रिसमस उत्सव (मिझोराम, नागालॅन्ड आणि मेघालय)
27 डिसेंबर - शुक्रवार - ख्रिसमस उत्सव (मिझोराम, नागालॅन्ड आणि मेघालय)
28 डिसेंबर - चौथा शनिवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
29 डिसेंबर - रविवार (संपूर्ण भारतात सुट्टी)
30 डिसेंबर - सोमवार - यू किआंग नांगबाह यांच्या पुण्यतिथी (मेघालय)
31 डिसेंबर - मंगलवार - नवीन वर्ष सुरु होण्या आधीच्या दिवसासाठी असलेली सुट्टी (मिझोराम, सिक्किम)
प्रत्येक राज्याच्या सुट्ट्या या वेगळ्या असल्यानं प्रत्येकानं एकदा तुमच्या राज्यात कधी सुट्ट्या आहेत ते एकदा तपासून पाहा.