अहमदाबाद : गुजरातमध्ये 2002मध्ये नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी आज गुजरात उच्च न्यायालयानं गुजरातच्या माजी मंत्री माया कोडऩानी यांना निर्दोष मुक्त केलं. खालच्या न्यायालयानं कोडनानींना जन्मठेपेची शिक्षा केली होती. कोडनानी यांच्या सोबतच बजरंग दलाचा कार्यकर्ता बाबू बजरंगी यालाही खालच्या कोर्टानं जन्मठेपीची शिक्षा दिली. ही शिक्षा मात्र उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.
न्यायलयाने कोडनानीनी निर्दोष मुक्तता केल्याने राजकीय पटलावर सवाल उपस्थित केले जातायत. पाटीदार नेता हार्दिक पटेलने झी न्यूजशी बातचीत करताना सांगितले की, कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केल्याने अनेक सवाल उपस्थित केले जातायत.
एकीकडे बाबू बजरंगीची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवलेली असताना कोडनानी यांची निर्दोष मुक्तता कशी केली जाऊ शकते असा सवाल यावेळी हार्दिकने उपस्थित केला.
न्यायमूर्ती हर्षा देवानी आणि न्यायमूर्ती ए एस सुपेहिया यांच्या पीठाने या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर गेल्या ऑगस्टमध्ये याबाबतचा आदेश राखून ठेवला होता. या प्रकरणात स्पेशल कोर्टाने भाजप आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांच्यासह ३२ लोकांना दोषी ठरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.