Vikram lander Chandrayaan-2 : चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर (Chandrayaan-3 Landing) आता भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारत दक्षिण धृवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे आता भारत महाशक्तीच्या स्पर्धेत अग्रस्थानी पोहोचलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय आंतराळ संस्था म्हणजेच इस्त्रोने (ISRO) चांद्रयान-3 ची महत्त्वाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून (X Handle) शेअर करण्यात येत आहे. अशातच आता इस्त्रोने डिलीट केलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. इस्त्रोने विक्रम लँडरची (Vikram Lander) ती पोस्ट डिलीट का केली? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.
चार वर्षापूर्वी म्हणजे 2019 साली जेव्हा चांद्रयान-2 लाँच करण्यात आलं होतं. त्यावेळी चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या चांद्रयानाचा आणि रोवरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर आता विक्रम लँडरसोबत चांद्रयान-2 चा संपर्क झाला आहे. मोठा भाऊ म्हणून चांद्रयान-2 विक्रम लँडरवर लक्ष ठेवतोय. विक्रम लँडर जेव्हा चंद्रावर उतरत होता. त्यावेळी चांद्रयान-2 ने लक्ष ठेवण्याचं काम केलं होतं. विक्रम लँडरचे फोटो इस्त्रोपर्यंत पोहोचवण्याचं काम चांद्रयान-2 ला सोपवण्यात आलं होतं. त्याचे काही फोटो इस्त्रोने एक्स हँडलवर शेअर केले होतो. तो आता डिलीट करण्यात आला आहे.
चांद्रयान-2 ऑर्बिटरने (Chandrayaan-2 Orbiter) घेतलेल्या चांद्रयान-3 लँडरच्या प्रतिमा शेअर केल्या होत्या. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटर हाय-रिझोल्यूशन कॅमेरा (OHRC) मध्ये सध्या चंद्राभोवती सर्वोत्तम रिझोल्यूशन आहे, असं इस्त्रोने सांगितलं होतं. मात्र, काही मिनिटानंतर स्पेस एजन्सीने आपल्या X हँडलवरून पोस्ट हटवली. त्यानंतर सोशल मीडियावर संभ्रमाचं वातावरण तयार झाल्याचं चित्र आहे.
चांद्रयान 3 च्या यशामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक करारांना आणखी चालना मिळेल, कारण तिची तांत्रिक क्षमता आणि प्रक्षेपण प्रणाली स्वीकारली जाईल. चांद्रयान-3 चे यश हे भारताच्या ग्रह संशोधनाला सुरुवात करण्यासाठीची पहिली पायरी आहे, असं इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांनी म्हटलं होतं. चांद्रयान-3 चा एकूण खर्च 615 कोटी रुपये आहे, जो हिंदी सिनेमाच्या निर्मिती बजेटपेक्षा कमी आहे. त्यामुळे आता इस्त्रोवरील विश्वास देखील वाढल्याचं पहायला मिळत आहे.