Indias Accident Relief Medical Train: भारतात लाखो प्रवासी दररोज ट्रेनने प्रवास करतात. दूरवरचे अंतर कमी खर्चात आणि कमी वेळात पार करण्यसाठी रेल्वे खूपच उपयोगी पडते. रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. तुम्ही 'शताब्दी' किंवा 'राजधानी'ने प्रवास केला असेल तर या एक्सप्रेससाठी इतर ट्रेन थांबवल्या जातात, असा अनुभव तुम्हाला आला असेल. पण या अत्यंत वेगवान ट्रेनदेखील एका ट्रेनसाठी थांबतात तुम्हाला माहिती आहे का?
भारतातील रेल्वे रुळावर अशी एक व्हीव्हीआयपी ट्रेन धावते जिला वाट करुन देण्यासाठी राजधानी आणि शताब्दीलाही थांबावे लागते. या ट्रेनपुढे राजधानी असो, दुरांतो असो की शताब्दी असो, या सगळ्या ट्रेन्स थांबतात. व्हीआयपी ट्रेन असो की व्हीव्हीआयपी ट्रेन, अशा सर्व ट्रेन्सना या ट्रेनला पासिग द्यावी लागते.
ही ट्रेन 'वंदे भारत' आहे, असे तुम्हाला वाटत असेल. कारण वंदे भारत ट्रेनला मार्ग करुन देण्यासाठी अनेक एक्सप्रेस थांबलेल्या आपण पाहिले असेल. मग या ट्रेनचे नाव काय?
अपघात निवारण वैद्यकीय ट्रेन असे या ट्रेनचे नाव आहे. इतर कोणत्याही ट्रेनला पास न देता ती धावत असते. ही ट्रेन जेव्हा रुळावर धावते तेव्हा पुढे कोणतीही ट्रेन असो, तिला पुढे जाऊ देण्यासाठी थांबावे लागते.
भारतात कुठेही रेल्वे अपघात झाला की, ही ट्रेन लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचे काम करते. या ट्रेनमध्ये आधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय सुविधा असतात. जखमींवर तातडीने उपचार करता यावे यासाठी ट्रेनमध्ये डॉक्टर आणे पॅरामेडिकल स्टाफची टीमदेखील असते. अपघात निवारण वैद्यकीय गाड्या कुठे उभ्या असतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचे उत्तर जाणून घेऊया. भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या यार्ड आणि स्थानकांवर या ट्रेन उभ्या असतात. कोणतीही रेल्वे दुर्घटना घडल्यास ही ट्रेन बचाव आणि मदत कार्यासाठी अत्यंत कमी वेळात अपघातस्थळी पोहोचते. त्यामुळे ही गाडी लवकरात लवकर अपघातस्थळी नेण्यासाठी इतर गाड्या थांबवल्या जातात.
IRCTC अॅपच्या माध्यमातून तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किती सीट रिकाम्या आहेत याची माहिती मिळवू शकता. व त्यानुसार ट्रेनचे तिकिट बुकिंग करु शकता. अचानक तुम्हाला कुठे जायचं असेल तर हे फिचर तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. या फिचरला Chart Vacancy असं नाव देण्यात आलं आहे. येथे तुम्ही ट्रेननंबर किंवा नाव टाकून किती आणि कोणत्या सीट रिकाम्या आहेत हे पाहू शकणार आहात.
अॅपमध्ये अशी मिळणार रिकाम्या सीटची माहिती
- सगळ्यात पहिले तुम्ही IRCTC मोबाइल अॅप डाउनलोड करा
- आता होमस्क्रीनवर दिसणाऱ्या ट्रेन आयकॉनवर टॅप करा
- त्यानंतर Chart Vacancy नावाचा एक पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा
- आता तुमचं नाव आणि त्या ट्रेनचा नंबर टाका, ज्यामुळं रिकाम्या सीटबद्दल माहिती मिळेल
- त्यानंतर ज्या स्टेशनवरुन तुम्हाला ट्रेन पकडायची आहे, तो निवडा
- आता ट्रेनमधील रिकाम्या सीटची माहिती स्क्रीनवर दिसेल.
IRCTC वेबसाइटच्या माध्यमातून अशी माहिती काढा
- तुम्ही लॅपटॉप किंवा कंप्युटरवर IRCTCची अधिकृत वेबसाइट सुरू करा
- आता होमपेजवर Book Ticket बॉक्सच्या बाजूलाच असलेल्या Chart/Vacancy पर्याय दिसेल, यावर क्लिक करा
- स्क्रीनवर Reservation Chart सुरू होईल