Independence Day : केंद्र सरकारने कलम 370 रद्द (Article 370) केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. पूर्वीच्या तुलनेत काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काश्मिरी तरुणही फुटीरत्यावाद्यांना विरोध करताना दिसत आहे. याचाच प्रत्यय नुकताच आला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वीच उत्तर काश्मीरमधील सोपोरमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा (Hizbul Mujahideen) दहशतवाद्याचा भाऊ त्याच्या घरावर तिरंगा फडकवताना दिसत आहे. राष्ट्रीय ध्वज (Indian Flag) फडकावणाऱ्या व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
हिजबुल संघटनेच्या दहशतवाद्याचा भाऊ स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथील त्याच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवताना दिसल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हिजबुलचा दहशतवादी जावेद मट्टूचा भाऊ रईस मट्टू त्याच्या घराच्या खिडकीतून तिरंगा फडकवताना दिसत आहे. जावेद मट्टू हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सक्रिय दहशतवादी आहे. गेल्या 11 वर्षांपासून तो पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे.
जावेद मट्टूला फैसल/साकिब/मुसैब या नावानेही ओळखले जाते. तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित सक्रिय दहशतवादी आहे. सुरक्षा यंत्रणेच्या यादीत तो घाटीच्या टॉप 10 लक्ष्यांपैकी एक आहे.
दुसरीकडे, हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी मुदस्सीर हुसैन याच्या कुटुंबानेही रविवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकावला. हुसैन याच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी तिरंगा फडकवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत सहभाग घेतला आहे. हुसैनचे वडील तारिक यांनी सांगितले की, 'माझ्या मुलाने चुकीचा मार्ग स्वीकारला आहे. त्याला शोधण्याची आम्ही सरकारला विनंती करतो आहोत. घरावर आणि प्रत्येक ठिकाणी तिरंगा फडकवायचा आहे.'
मुदस्सीर हुसैनवर 20 लाखांचे बक्षिस
हुसैनच्या आईने सांगितले की, मुलाने परत यावे आणि सुरक्षा दलांना आत्मसमर्पण करावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्याचा पत्ता जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण अपयशी ठरलो. त्याने परत यायला हवं. आमची इच्छा आहे की लष्कराने त्याचा शोध घ्यावा. केंद्रशासित प्रदेशातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या मुदस्सीर हुसैनच्या डोक्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस आहे.
How things have changed in Kahsmir under Modi Govt.
Sopore, Kashmir: Rayees Mattoo, the brother of Javed Mattoo, a wanted and active terrorist, raised Tiranga at his home to join the #HarGharTiranga movement.
@AngrySaffron pic.twitter.com/k9SHwjOp3A
— Satya_Anveshi (@Pappu_Ka_Halwai) August 14, 2023
काश्मीरमध्ये तिरंगा यात्रा
दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरमधील वातावरण पूर्णपणे देशभक्तीमय झाले आहे. श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातून रविवारी एक बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी प्रत्येकाच्या हातात तिरंगा होता. याशिवाय स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत, अशा परिस्थितीत बाईकस्वारांनी तिरंगा यात्रा काढली होती. त्या तिरंगा यात्रेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.