IAS Divya Iyer यांचा 'नगाडे संग ढोल बाजे' डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सनदी अधिकारी अत्यंत अभ्यासू, शिस्तबद्ध असतात. परंतू त्यांच्यातही एक कलाकार लपलेला असतो. असंच एक व्यक्तीमत्व देशभरात व्हायरल होत आहे. 

Updated: Apr 7, 2022, 10:17 AM IST
IAS Divya Iyer यांचा 'नगाडे संग ढोल बाजे' डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल title=

तिरुवअनंतपूरम : सनदी अधिकारी होण्यासाठी अथक मेहनत आणि परिश्रम करावी लागते. सनदी अधिकारी अत्यंत अभ्यासू, शिस्तबद्ध असतात. परंतू त्यांच्यातही एक कलाकार लपलेला असतो. असंच एक व्यक्तीमत्व देशभरात व्हायरल होत आहे. केरळमधील IAS Divya Iyer यांचा कॉलेजच्या तरुणींसोबतचा डान्स खूप व्हायरल होत आहे.

सनदी अधिकारी दिव्या अय्यर या केरळमधील पथानमथित्ता जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांमध्येही एक अनोखा कलाकार असल्याचं समोर आलं. त्या सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थीनींसोबत डान्स केला आहे.

एमजीयू विद्यापीठाच्या युथफेस्टमध्ये दिव्या सामील झाल्या होत्या. तिथे विद्यार्थीनी डान्स करीत होत्या. हिंदी चित्रपटातील 'नगाडे संग ढोल बाजे' हे गाणं सुरू असताना दिव्या यांना देखील डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी सुद्धा तरुणींसोबत डान्स केला.

त्यांचा हा व्हिडीओ जेष्ठ पत्रकार निथू रघुकुमार यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट येत आहेत.