"तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार

Champions Trophy 2025: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नाहीये. याबद्दलच बोलताना त्याने टीम इंडियाबद्दल वाईट उद्गार काढले आहेत. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 2, 2024, 12:39 PM IST
"तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार title=

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच काहीना काही वक्तव्य करत असतो. आता अलीकडेच त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर तो खूश नसल्याचे सांगितले. सर्वांकडून हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली आहे, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB ) मान्यता देण्यापूर्वी काही अटी घातल्या आहेत. पीसीबीकडे यंदा या स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार आहे. ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तान त्यांच्या मैदानावर आयोजित करण्यावर ठाम आहे. पण या निर्णयावर सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आपला भारतीय संघ पाकिस्तानला पाठविण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने पीसीबीला हायब्रीड मॉडेलचा पर्याय दिला आहे. पीसीबीने सुरुवातीला या पर्याय मान्य केला नाही, परंतु नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांची भूमिका मवाळ झाली आहे.  याच दरम्यान आता यावर  शोएब अख्तरने मोठी वक्तव्य केली आहेत. 

काय म्हणाला शोएब अख्तर?

अख्तर म्हणाला की, “तुम्हाला होस्टिंग अधिकार आणि कमाईसाठी पैसे मिळत आहेत. हे ठीक आहे. आपण सर्वजण हे समजतो. पाकिस्तानची भूमिकाही योग्य आहे. त्यांनी भक्कम स्थान राखायला हवे होते, हो की नाही? एकदा आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यास सक्षम झालो आणि ते यायला तयार नसतील तर त्यांनी आमच्यासोबत महसूल वाटून घ्यावा. तो एक चांगला कॉल आहे." 

हे ही वाचा: IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन

तिकडेच त्यांची मारून या... 

यापुढे त्याने भारतात पाकिस्तानी टीमने खेळायला जाण्याबद्दल बोलला, " पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा.  पण, त्यांनी आपला संघ अशा प्रकारे तयार केला  पाहिजे की, पाकिस्तान भारताला त्यांच्याच घरात पराभूत करू शकेल.  भविष्यात भारतात खेळण्याच्या दृष्टीने आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि तिथे जायला हवे. माझा नेहमीच असं म्हणणे पाहिजे की,  भारतात जा आणि तिथेच  त्यांची मारून या.  मला समजते की हायब्रीड मॉडेलवर आधीच स्वाक्षरी झाली होती." 

हे ही वाचा: बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!

 

हे ही वाचा: IND vs PAK: टीम इंडिया ढेपाळली.. टॉप-3 पाकिस्तानी धावा करणाऱ्या खेळाडूंएवढ्याही धावा भारताला करता आल्या नाहीत, झाला लाजिरवाणा पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अजून जाहीर झाले नाही 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आयसीसीची बैठक होऊनही अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही. 
असे मानले जाते की जर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली गेली तर भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल. याशिवाय जर तो उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्याचे सामने पुन्हा यूएईमध्ये होतील.