जावयाचा 'बदला'पूर! पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी पार्सल बॉम्ब

Parcel Blast Case: पत्नीला घटस्फोट देताना त्याने घटस्फोटासाठी ज्यांना जबाबदार मानले त्यांचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. ऑनलाइन त्याने बॉम्ब बनवण्याचा शिकला आणि पार्सल बॉम्ब सासरी पाठवला अन् मग...

नेहा चौधरी | Updated: Dec 23, 2024, 10:46 PM IST
जावयाचा 'बदला'पूर! पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी पार्सल बॉम्ब title=

Parcel Blast Case: पत्नी, सासरे आणि तिच्या मित्राचा काटा काढण्यासाठी चक्क बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलाय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही सत्य घटना आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. काय आहे हे प्रकरण. 

जावयाचा 'बदला'पूर! सास-याला धडा शिकवण्यासाठी पार्सल बॉम्ब

सासऱ्याकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जावयानं सास-याच्या घरी बॉम्ब स्फोट घडवून आणलाय. जावयानं चक्क पार्सल बॉम्ब पाठवून सास-याचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय. पार्सल घरी आल्यानंतर त्याचा भीषण स्फोट झालय. त्यात सासरे त्यांचा मुलगा आणि एक लहान मुलगा जखमी झालाय. स्फोट एवढा शक्तिशाली होता की घरातील सामानाची ही अशी राखरांगोळी झालीय. तर रस्त्यावर रक्त सांडल्याचं पाहाया मिळालंय. या स्फोटात एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी 44 वर्षीय रुपेन राव याला तीन ते चार महिन्यांत इंटरनेटवर बॉम्ब आणि शस्त्रे बनवण्याची माहिती मिळाली होती. सासरच्या मंडळींकडून, विशेषत: पत्नीचा मित्र बलदेव सुखाडिया, सासरा आणि पत्नीच्या भावाचा बदला घेण्याचा त्याचा हेतू हा बॉम्ब हल्ला केला. 

जखमी कमल सुखड़िय यांनी सांगितलं की, एक व्यक्ती हातात पार्सल घेऊन आला होता. ज्यात बॉम्ब होता जे आम्हाला माहिती नव्हतं. दोन व्यक्ती ऑटोमध्ये बाहेर उभे होते. त्यांच्या हातात रिमोट होता. त्यांनी रिमोट दाब्यानंतर स्फोट झाला. हा स्फोट भयंकर होता. खूप नुकसान झालं. त्याने या हल्ल्यात ऑनलाइन बनवायला शिकलेले घरगुती बॉम्ब आणि शस्त्रे वापरण्याची योजना आखली. शनिवारी सकाळी 10.45 वाजता साबरमती येथील कच्छाच्या घरात बॉम्बस्फोट झाला.धक्कादायक म्हणजे आरोपी रुबेन बारोटनं इंटरनेच्या  मदतीनं पार्सल बॉम्ब तयार करण्याची माहिती घेतल्याचं तपासातून समोर आलंय. एवढचं नव्हे तर इंटरनेच्या मदतीनं त्यानं गावठी पिस्तुलही तयार केलं.. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आरोपीनं पार्सल बॉम्ब का तयार केला तर त्याची पत्नी तिच्या मित्रासोबत राहत होती. त्यामुळे वेगळं राहणाऱ्या पत्नी, सासरे आणि आणि पत्नीच्या भावाला धडा शिकवण्यासाठी त्यानं पार्सल बॉम्ब घडवून आणलाय. चौकशीदरम्यान राव याने सांगितलं की सुखाडियाने त्याचे आणि त्याच्या पत्नीचे संबंध ताणले होते आणि त्याला त्याच्या मुलांपासून वेगळे केले होते.

गुजरातमधील अहमदाबामधील ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी तिन आरोपींना बेड्या ठोकल्यात.. तर त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूसही जप्त केलेत. त्यामुळे या निमित्तानं पत्नी पती आणि वो ची पुन्हा सुरू झालीय.