'या'साठी तब्बल 8 KM धावला घोडा, कारण जाणून वाटेल आश्चर्य, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक घोडा वेगाने पळत आहे.

Updated: Apr 4, 2022, 09:55 PM IST
'या'साठी तब्बल 8 KM धावला घोडा, कारण जाणून वाटेल आश्चर्य, पाहा व्हिडीओ title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : मुक्याप्राण्यांवर बरेच लोक खूप प्रेम करतात. परंतु आपल्याला बऱ्याचदा वाटतं की, या प्राण्यांना आपलं प्रेम कळत असेल का? त्यांना नाती कळत असतील का? परंतु आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज या घोड्यानं दिलं आहे. जो तब्बल 8 किलोमीटर आपल्या बहिणीसाठी धावत रुग्णालयापर्यंत पोहोचला. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. परंतु या घोड्याच्या या व्हिडीओने अनेकांसमोर नात्याचं एक उत्तम उदाहरण ठेवलं आहे.

IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला अवघ्या काही तासांतच जवळपास 14.4 हजार लाईक्ल मिळाले आहेत. तर 2 हजारापेक्षा जास्त वेळा याला रिट्वीट केलं गेलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक घोडा वेगाने पळत आहे. परंतु तो इतका का पळत आहे आणि त्याचा असा व्हिडीओ का बनवला गेला असावा? असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येत असेल, तर तुम्हाला हे जाणून आश्चर्यवाटेल की हा घोडा त्याच्या बाहिणीसाठी धावत आहे.

या व्हिडीओला नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की, हा घोडा एका रुग्णवाहिकेच्या मागे पळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णवाहिकेत त्याची एक आजारी बहीण होती, आणि तिला उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होतं.

जिच्यासाठी हा घोडा जवळपास 8 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला. तो या रुग्णवाहिकेचा पाठलाग करत पशू रुग्णालयात पोहोचला आहे.

या घोड्याबद्दल असे की सांगितले जाते की, त्याची बहिण बरी होई पर्यंत तो त्या रुग्णालयातच राहिला होता.

हा व्हिडीओपाहून सोशल मीडियावर अनेक जण भावूक झाले आहेत आणि प्राण्यांनाही माणसांप्रमाने नाती कळतात आणि त्यांना देखील भावना असतात, हे अनेकांनी मान्य केलं आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओवर लोकांनी भरभरुन प्रेम व्यक्त केलं आहे.