HDFC बँकेत खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना होणार जबरदस्त फायदा

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांना मुदत ठेवींवरील व्याजदरात (Fixed Deposit) वाढ केली आहे

Updated: Dec 3, 2021, 03:44 PM IST
HDFC बँकेत खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना होणार जबरदस्त फायदा title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांना मुदत ठेवींवरील व्याजदरात (Fixed Deposit) वाढ केली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या द्वि-मासिक चलनविषयक धोरण पुनरावलोकनाच्या (RBI MPC Meeting) एक आठवडा अगोदर ही दरवाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने एकाधिक मुदतीच्या एफडीवर 10 बेसिस पॉइंट्सपर्यंत दर वाढवले ​​आहेत

7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD 

HDFC बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव (FD) सुविधा देते. याशिवाय. HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना FD (RBI MPC Meeting)वर अतिरिक्त व्याज देखील देते.

हेदेखील वाचा Multibagger stock | या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; अजूनही एक्सपर्ट्सच्या रडारवर

ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा 

याशिवाय बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के अधिक व्याज देत आहे. एखाद्याने ऑनलाइन एफडी केली तरी त्याला अधिक फायदे मिळतील. बँक 0.10 टक्के अधिक व्याज देत आहे. यापूर्वी, ग्राहकांना 36 आणि 60 महिन्यांच्या एफडीवर 6.05 टक्के आणि 6.4 टक्के दराने व्याज मिळत होते.

हेदेखील वाचा - Rakesh Jhunjhunwala यांचा हा शेअर पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत; ब्रोकरेजही बुलिश

आयसीआयसीआय बँकेने एफडीचे व्याज बदलले

याशिवाय, ICICI बँकेने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. बँकेने म्हटले आहे की सुधारित व्याजदर नवीन आणि विद्यमान एफडीवर लागू होतील.

ICICI बँक किमान सात दिवसांच्या कालावधीसह FD गुंतवणूक ऑफर करते. खाते उघडल्यानंतर सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत ठेव काढल्यास, ग्राहकाला कोणतेही व्याज मिळत नाही.