गुजरात पोटनिवडणूक : भाजपकडून मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप

गुजरातमध्ये विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान आज झाले. यावेळी काही मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप  केला आहे. 

Updated: Nov 3, 2020, 06:53 PM IST
गुजरात पोटनिवडणूक : भाजपकडून मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप  title=
Pic Courtesy : twitter @SATAVRAJEEV

अहमदाबाद : गुजरातमध्ये ८ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान आज झाले. यावेळी काही मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी केला आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सातव यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 

भाजपचे पन्ना प्रमुख नेमके काय करतात याचा पर्दाफाश या व्हिडिओत झाल्याचा दावाही सातव यांनी केला आहे. गुजरातमधील कर्जन मतदारसंघातील हा व्हिडिओ आहे. राज्याच्या निवडणूक आयोगानं याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सातव यांनी केली आहे.

काँग्रेस उमेदवार किर्तीसिंह जाडेजा यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अक्षय पटेल यांच्यावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. अक्षय पटेल भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. गुजरातमध्ये आज विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक झाली आहे. यात वडोदऱ्यातील कारजान विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.