मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर पुन्हा एकदा कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १९ पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर २० पैशांनी कमी झालेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८२ रुपये ४३ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७५ रुपये १६ पैसे झालाय.
तेलाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात असे भाकित एंजेल ब्रोकिंग हाऊसचे उर्जा विषयक विशेषज्ञ अनुज गुप्ता यांनी केलंय.
तेल उत्पादक प्रमुख देश असलेला सौदी अरब देश तेलाच्या निर्यातीत कपात करणार आहे. डिसेंबरमध्ये तेलाची निर्यातीत प्रतिदिन पाच लाख बॅरलने घट होऊ शकते असे सौदी अरबच्या उर्जा मंत्र्यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सौदीने तेल कपातीचा निर्णय घेतल्याचेही त्यांच्या उर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले.