Railway News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये, सरकारी केंद्रीय कर्मचारी आता तेजस ट्रेनमध्ये मोफत किंवा कमी दरात प्रवास करू शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

Updated: Sep 14, 2022, 06:29 PM IST
Railway News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास title=

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता ते तेजस एक्सप्रेममध्ये (Tejas Express) मोफत प्रवास करू शकणार आहेत. त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर त्यांना ही सूट मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) नोटीस जारी केली आहे. यामध्ये सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) आता तेजस ट्रेनमध्ये मोफत किंवा कमी दरात प्रवास करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विभागाने अधिकृत टूरसाठी तेजस एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवासात सवलत (Discount on travel in Tejas Express) देण्याचा विचार केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ऑफिस मेमोरँडमनुसार, ही सूट टूर, ट्रेनिंग, ट्रान्सफर आणि रिटायरमेंट ट्रॅव्हल्ससाठी लागू असेल आणि सूट मिळालेल्या गाड्यांव्यतिरिक्त. तेजस एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्याची पात्रता शताब्दी गाड्यांप्रमाणेच असेल.

कोणते कर्मचारी लाभ घेऊ शकतात

रेल्वे प्रवासासाठी कोणते कर्मचारी लाभ घेऊ शकतात, हे कर्मचाऱ्यांच्या पगारावर अवलंबून आहे, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. पात्र सरकारी अधिकाऱ्यांना प्रीमियम ट्रेन, प्रीमियम तत्काळ ट्रेन, राजधानी, शताब्दी, दुरांतो ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे. ते कमी भाड्यात किंवा विनामूल्य प्रवास करू शकतात. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने एक नोटीस जारी करून तेजस ट्रेनला प्रीमियम ट्रेनच्या यादीत टाकले आहे. असे केल्याने केंद्र सरकारचे कर्मचारी अधिकृत टूरसाठी या गाड्यांमधून प्रवास करू शकतात.

तेजस-राजधानी एक्स्प्रेसची विशेषता

तेजस-राजधानी एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन आहे. रेल्वेची कमाल वेग 160 किमी प्रतितास आहे. तेजसचे डबे अपग्रेड केले आहेत. हे रेल्वे कोच फॅक्टरी, कपूरथला येथे तयार केले जाते. 20 डब्यांची ही देशातील पहिली ट्रेन आहे, ज्याच्या सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत. याशिवाय, प्रत्येक डब्यात चहा-कॉफी व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येक सीटवर एलसीडी स्क्रीन आणि वाय-फाय आहे. भारतीय रेल्वेची ट्रेन नसून कॉर्पोरेट ट्रेन IRCTC द्वारे चालवलेली पहिली ट्रेन होण्याचा मान तिला मिळाला आहे.