मुंबई : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या किंमतीत 0.22 टक्के घसरण झाली आहे.
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने आज 0.15 टक्क्यांनी कमी होऊन 46,001 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या व्यापारात चांदी 0.22 टक्के घसरली. आज 1 किलो चांदीची किंमत 60,503 रुपये आहे.
वर्ष 2020 बद्दल बोलायचे तर, गेल्या वर्षी याच कालावधीत, MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स MCX वर सोने 46,001 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 10200 रुपयांनी स्वस्त होत आहे.

सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.