दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जाणून घेऊया आजचे दर 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 22, 2024, 10:54 AM IST
दिवाळीआधी सोनं खरेदी करावं का? वाचा काय आहेत आजचे 24 कॅरेटचे दर  title=
Gold and silver prices hit record highs ahead of diwali 2024

Gold Price Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं. या दिवसांत लोक काही ना काही तरी सोनं खरेदी करतात. मात्र यंदा ही परंपरा जपण्यासाठी तुमच्या खिशावर थोडा आर्थिक भार पडणार आहे. सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी घेतली आहे. दिवाळीच्या आधीच चांदीने लाख रुपयांचा आकडा गाठला आहे. तर, सोनं देखील 80 हजारांचा आकडा लवकरच गाठू शकतो अशी शक्यता आहे. 

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधीच चांदीने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची उसळी घेतली आहे. सराफा बाजारासह वायदे बाजारातही सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत. तर, सोन्यानेदेखील नवा विक्रम रचला आहे. वायदे बाजारात MCXवर सोन्याच्या दरात 359 रुपयांची दरवाढ झाली असून सोनं प्रति 10 ग्रॅम 78,398 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदीदेखील एक किलोप्रति लाखापर्यंत पोहोचणार आहे. 

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत होणारी वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होत आहे. मात्र, तरीही भारतीय ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली नाहीये. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,010 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  79,650 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,740 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,301 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 965 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 974 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,408 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63,720 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,740 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 73,010 रुपये
24 कॅरेट-  79,650 रुपये
18 कॅरेट-  59,740 रुपये