नवी दिल्ली : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुवाहाटी मेडिकल कॉलेजचे अधीक्षक अभिजीत शर्मा म्हणाले की, नऊ डॉक्टरांची टीम वयाच्या गोगाई यांच्यावर उपचार करत होती. 84 वर्षीय काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचं आज निधन झालं.
आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले तरुण गोगोई यांना २ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 25 ऑगस्ट रोजी गोगोई यांना कोरोनाची लागण झाली होती आणि दुसर्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 25 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या निधनावर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
Shri Tarun Gogoi Ji was a popular leader and a veteran administrator, who had years of political experience in Assam as well as the Centre. Anguished by his passing away. My thoughts are with his family and supporters in this hour of sadness. Om Shanti. pic.twitter.com/H6F6RGYyT4
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2020
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवल यांनी देखील त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Assam Chief Minister Sarbananda Sonowal pays last respects to the mortal remains of former Chief Minister Tarun Gogoi, at GMCH hospital in Guwahati. pic.twitter.com/NHbJy7ORyr
— ANI (@ANI) November 23, 2020