VIDEO: गाण ऐकताच डुलायला लागला हत्ती, तुफान डान्स व्हाल हैराण

हत्तीच्या पिल्लाचा डान्स पाहून व्हाल त्याचे फॅन, पाहा VIDEO  

Updated: Jan 29, 2021, 12:13 PM IST
VIDEO: गाण ऐकताच डुलायला लागला हत्ती, तुफान डान्स व्हाल हैराण title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी हत्तीचा मृत्यू झाल्यानं एक अधिकारी भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओ पाहून युझर्सचे डोळे देखील पाणावले होते. हत्तीसोबत असणारी अतूट मैत्री पाहून युझर्सचे डोळे पाणावले होते. हत्तीच्या पिल्लांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी कसरती करताना तर कधी खेळताना तर कधी खोड्या करताना. पण हत्ती नाचतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

एक क्षण हत्ती नाचतो ही कल्पना केली तर धडकी भरेल किंवा हसू येईल. पण असा एक व्हिडीओच आता समोर आला आहे. हत्तीचं पिल्लू गाणं ऐकताच त्यावर ठेका धरत आहे. गाण्यातील बीट ऐकून त्याचे पाय आणि सोंड थिरकायला लागली आहे. त्याचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गन्नूप्रेम नावाच्या एका ट्वीटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ 28 जानेवारीला शेअर करण्यात आला आहे. हॉलमध्ये हत्ती आणि मुलगा बसले आहेत. मुलगा मोबाईलवर गाणं लावतो आणि ते ऐकून हत्ती देखील आपली मान डोलवत नाचायला लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आतापर्यंत 24.6 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 2.3 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक युझर्स या हत्तीच्या पिल्लाला भेटण्यासाठी आतूर आहेत. काहींनी तर चक्क हत्तीच्या पिल्लाचा डान्सपाहून त्याला मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.