नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.2 रिक्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. उत्तर काश्मीरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
भारतात याआधीच अनेक राज्यांमध्ये 2 दिवसांपासून वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात यामुळे मोठं नुकसान झालं आहे.