महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकार मोठा दिला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला. त्यानंतर आजच दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्यांना दिलासा देत सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केला करण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेत असतात. त्यामुळे 1 तारखेपासून नवे दर लागू होतील.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला राजधानी दिल्लीत घरगुती सिलेंडरचा दर 1103 होता. तर मुंबईत सिलेंडरसाठी 1102.50 रुपये, कोलकाता 1129, चेन्नईत 1118.50 रुपये मोजावे लागत होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेत त्यात बदल करत असतात. त्यामुळे एलपीजी 200 रुपयांनी स्वस्त झाल्याने आता मुंबईत मुंबईत 902 रुपये दर झाला आहे.
पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित करतात. त्यानुसार उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर अनुदान दिली जाणार नाही.
उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी एका वर्षात एकूण 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर अनुदान घेऊ शकतात. 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देतं.
अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनशी लिंक करावा लागतो. तसंच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार गॅस कनेक्शनशी जोडलेलं असणंही आवश्यक आहे. मार्च 2023 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटीहून अधिक मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनचे वितरण केलं आहे.