SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड

SCAM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या 'मन की बात'मध्ये सायबर क्राईमच्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. त्याचसंदर्भातील ही बातमी...   

सायली पाटील | Updated: Oct 28, 2024, 12:11 PM IST
SCAM : 4 महिन्यांत तुमच्या मेहनतीचे 1200000000 कोटी रुपये बुडाले; सरकारी आकडेवारीमुळं भांडाफोड  title=
Digital Fraud cyber crime increased in first four months of 2024 know details

SCAM : जानेवारी 2024 ते एप्रिल 2024 या चार महिन्यांमध्या भारतात सायबर क्राईममुळं मोठी आर्थिक अफरातफर झाली असून, या प्रकरणात भारतीयांचे, बहुतांश सामान्यांच्या मेहनतीचे तब्बल 120 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच मन की बात या उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना Cyber Crime च्या वाढत्या प्रकरणांकडे लक्ष वेधलं होतं. जिथं त्यांनी वाढती गुन्हेगाली आणि डिजिटल फ्रॉडसंदर्भात चिंतेचा सूर आळवला होता. 

मोदींनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला असतानाच एका सरकारी संकेतस्थळाच्या माहितीनुसार 2024 च्या सुरुवातीच्याच तीन महिन्यांमध्ये साधारण 7.4 लाख लोकांनी सायबर क्राईमची तक्रार केली. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा अतिशय मोठा असल्याचं सांगितलं जात आहे. 2023 मध्ये ही आकडेवारी 15.56 लाखांवर होती. तर, 2022 मध्ये 9.66 लाखांवर. 2021 मध्ये सायबर क्राईमसंदर्भात फक्त 4.52 लाख तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. 

Indian Cybercrime Coordination Centre च्या सीईओपदी असणाऱ्या राजेश कुमार यंच्या माहितीनुसार या सर्व घोटाळ्यामध्ये जवळपास 1420 कोटी रुपयांचतं नुकसान झालं असून, व्यवसाय आणि गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय रोमॅन्स आणि डेटिंग अॅपच्या नावाखालीसुद्धा अनेकांकडून पैसे लाटण्याच्या घटना घडल्या आहेत.  

हेसुद्धा वाचा : 'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र 

इतकंच नव्हे, तर एका नव्या अहवालातील माहितीनुसार यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच 46 टक्के सायबर क्राईमसंदर्भातील तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, यामध्ये सर्वाधिक प्रकरणं म्यानमार, कंबोडिया आणि लाओससारख्या देशांशी संबंधित आहेत. अनेक सायबर गुन्हेगार याच देशांमध्ये असून, तिथून ते भारतीयांना जाळ्यात अडकवत आहेत. 

वेगानं बदलणारं तंत्रज्ञान आणि दर दिवशी समोर येणारं त्याचं नवं रुप यामुळं सध्या सायबर गुन्हेगारीत भर पडताना दिसत आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्वप्रथम विविध उपकरणं हाताळणाऱ्यांनी Samrt User होऊन अनेक उणिवा हेरत स्वत:ची गोपनीय माहिती, कागदपत्रांचे क्रमांक आणि सरकारी ओळखपत्रांवरील माहिती चुकीच्या ठिकाणी शेअर केली जाणार नाही, याबाबत कायम सजग असणं गरजेचं ठरत आहे.