Devotees Reach Sabarimala For Makaravilakku Festival: केरळ येथील पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून 914 मीटर उंचीवर असलेलं सबरीमाला मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर राज्याच्या राजधानीपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या पथनामथिट्टा जिल्ह्यातील पंबापासून चार किलोमीटर वर आहे. या मंदिरात मंगळवारी संध्याकाळी दोन लाख यात्रेकरूंनी आकाशीय दिवे पाहिले. तिथे होणारी ही 'मकारा विल्लुक्कू' नावाची ही खगोलीय रोषणाई तीर्थयात्रेदरम्यान एक महत्त्वाची घटना मानली जाते. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन महिन्यांच्या सणासुदीच्या काळात हा प्रकाश तीन वेळा दिसून येतो आणि हे यात्रेकरूंसाठी एक दैवी चिन्ह मानले जाते.
या दिव्य प्रकाशाच्या दर्शनासाठी यात्रेकरू सकाळपासूनच उत्सुक होते. संध्याकाळी 6.44 च्या सुमारास प्रथमच आकाशीय प्रकाश दिसला आणि त्यानंतर आणखी दोनदा प्रकाश दिसला. हा प्रकाश दिसताच स्वामी सरनायप्पाच्या जयघोषाने मंदिर गुंजले. या मंदिरात जवळपास दोन लाख यतेकरू आले होते. मंदिर शहर आणि आसपासच्या सुरक्षेचे प्रमुख असलेले एडीजीपी एस. सृजित म्हणाले की, "जवळपास दोन लाख यात्रेकरू आहेत आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे." दक्षिण भारतातील अन्य राज्यांतून येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या राज्यातील यात्रेकरूंपेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. पंबा नदीपासून पायीच या मंदिरात जाता येते.
हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
परंपरेनुसार, पवित्र मंदिराला भेट देण्यापूर्वी, यात्रेकरू सहसा 41 दिवसांची कठोर तपश्चर्या करतात ज्यामध्ये ते बूट घालत नाहीत, काळे धोतर घालतात आणि फक्त शाकाहार पाळतात. यात्रेदरम्यान प्रत्येक यात्रेकरू आपल्या डोक्यावर 'लुरुमुडी' धारण करतो. 'लुरुमुडी' हे एकप्रकारचे किट आहे ज्यामध्ये नारळ असतात. हे नारळ 18 पायऱ्या चढण्याआधी फोडले जातात आणि त्याशिवाय कोणालाही 'सन्निधानम' मध्ये पवित्र 18 पायऱ्या चढण्याची परवानगी नसते.
प्रचंड गर्दी आणि तासनतास लांब असलेल्या रांगांचा सामना करत मंगळवारी यात्रेकरूंचा एक गट 'मकर विल्लुकू'च्या दिवशी प्रार्थना करण्यासाठी प्रसिद्ध भगवान अयप्पा मंदिरात पोहोचतो. पारंपरिक काळ्या पोशाखात आणि मोत्याचे मणी परिधान केलेले हे यात्रेकरू असतात. सर्व वयोगटातील यात्रेकरू या दिवशी प्रमुख देवता भगवान अय्यप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून मंदिराच्या उंच पायऱ्यांवर थांबले होते. कडाक्याची थंडी आणि लांबलचक रांगा असूनही, अय्यप्पा भक्तांचा उत्साह कमी झाला नाही. यावेळी मकरज्योतीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या विविध ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.