मुंबई : आपल्यापैकी अनेकजण करोडपती व्हायची सप्ने बाळगतात. ज्यात काहीच गैर नाही. पण, गोची अशी की, अनेकांना कष्ट करणे माहिती असते. पण, करोडपती होण्यासाठी किती पैसे गुंतवायचे हेच माहिती नसते. तुम्हाला माहित आहे का, बॅंकेमध्ये प्रतिदिन तुम्ही जर, केवळ १०० ते १५० रूपये गुंतवले तरीसुद्धा तुम्ही करोडपती बनू शकता. आश्चर्य वाटले ना...? मग घ्या जाणून...
गुतवणूक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि अभ्यासकांचे म्हणने असे की, जर एखाद्या युवकाने वयाच्या विशीत असताना गुंतवणूक करण्यसा सुरूवात केली. तसेच, गुंतवणुकीची ही रक्कम जरी अधिक नसली पण, नियमीत असले तरीसु्द्धा त्याचे करोडपती होणे हे नक्की असते. कमी वयात गुंतवणूक करण्याचा फायदा असा की, एकतर तुमच्यावर आर्थिक बोजा पडत नाही. दूसरे असे की, तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. पण, दुर्दैव असे की, आपल्यापैकी अनेक तरूण या गुंतवणूकीकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत.
कदाचीत वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की, प्रतिदिन केवळ १०० ते १५० रूपये गुंतवणूक करूनसुद्धा करोडपती होता येते. होय, इतक्या कमी गुंतवणुकीतही करोडपती होता येते. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक कमीत कमी २५ ते ३० वर्षे नियमीत ठेवावी लागते. एनडीटीव्हीच्या हवाल्याने जनसत्ताने दिलेल्या वृत्तात याबाबत माहिती दिली आहे. या वृत्तात म्हटले आहे की, जर तुम्ही १० टक्के गुंतवणूक रिटर्न स्वरूपात केली. त्यासाठी प्रतिमहिना ४३८७ रूपयांची गुंतवणूक केली तम्ही, २५ ते ३० वर्षांत करोडपती होऊ शकता. जर १२ टक्के रिटर्नवर तुम्हाला प्रत्येक महिन्यात २८३२ रूपये गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही १० टक्के गुंतवणूक रिटर्नवर केली तरीसुद्धा ३० वर्षांत तुम्ही १५ लाख ७९ हजार ३२० रूपये इतकी गुंतवणूक करता. मात्र, या रकमेवर चक्रवाढ व्याज पद्धतीमुळे तुम्ही करोडपती होऊ शकता.
मुळात तुम्ही जर गुंतवणूक करू इच्छित असाल तर, तुम्हाल गुंतवणुकीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांसाठी बॅंकेकडे फिक्स्ड डिपॉजिट हा पर्यंय उत्तम आहे.