Coronavirus: 'या' लोकांना Booster Dose ची गरज, ‘असे’ ऑनलाइन करा बुक

Booster Dose Complete Registration Process: चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने सावधगिरीसाठी लोकांना बूस्टर डोस मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. त्यासाठी स्लॉट बुक कसे करणार ते जाणून घ्या...

Updated: Dec 26, 2022, 04:46 PM IST
Coronavirus: 'या' लोकांना Booster Dose ची गरज, ‘असे’ ऑनलाइन करा बुक  title=

How to Book Covid 19 Booster Dose :  चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये (corona in china) फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. त्यातच कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीनने पुन्हा लपवाछपवी सुरु केली आहे. यापुढे चीनच्या आरोग्यविभागाला रुग्णसंख्या जाहीर करता येणार नाहीत, असा निर्णय चिनी सरकारने घेतला आहे.  त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली असून नागरिकांना  कोविड-19 चा बूस्टर डोस लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

चीनमध्ये BF.7 या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे रूग्णालयात रूग्णांना अपुरे बेड पडत आहे. या देशात दररोज 10 लाख कोविड प्रकरणे आणि 5 हजार मृत्यूंची नोंद झाली आहे. याचदरम्यान भारत सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रतिकारशक्ती सज्ज व्हावी यासाठी नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. यासाठी Covid 19 Booster Dose ऑनलाइन कसे बुक करावे? याबाबत जाणून घेऊया.  

वाचा : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video 

बूस्टर डोस पात्रता

तुम्ही तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रातून बूस्टर डोस मिळवू शकते. तसेच जेव्हा कोविडचा पहिला आणि दुसरा डोस घेतला असेल आणि त्याला 6 महिने झाले असतील तेव्हा देखील तुम्ही बूस्टर डोस घेऊ शकता.

बूस्टर डोस कसा बुक करायचा

-तुम्हाला Co-WIN पोर्टलवर जावे लागेल.
-Co-WIN पोर्टल जवळच्या परिसरातील आरोग्य केंद्र शोधावे लागेल.
- त्यानंतर जिल्हा, पिन कोड किंवा MAP द्वारे तुमचे आरोग्य केंद्र शोधू शकता.
-  जर तुम्हाला वर नमूद केलेल्या मार्गाने हेल्थ सेंटर सापडले नाही तर तुम्ही फोन नंबरद्वारे देखील शोधू शकता. फोन नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला पोर्टलवर फोन नंबर टाकून लॉग इन करावे लागेल.
- होम पेजवर तुम्हाला साइन इन बटण दिसेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करावा लागेल.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यामध्ये एक ओटीपी येईल आणि तो टाईप करावा लागेल.
- यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नवीन विंडो उघडेल. जिथे तुम्हाला 'शेड्यूल अपॉइंटमेंट' बटणावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अपॉइंटमेंट बुक केली जाईल.