मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. त्यात काही व्हिडीओ हे जंगली प्राण्याशी संबंधीत असतात. जंगलात काय सुरु असतं? प्राणी एकमेकांशी कसे वागतात? या सगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात, ज्यामुळे ते सोशल मीडियावर या संबंधीत व्हिडीओ पाहात असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जंगलामधील आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काट उभा राहिल. आपल्या मोठ्या मांजरी जसे, सिंह, वाघ, बिबट्या आणि चित्ता यांच्याबद्दल माहितच आहे. त्यांनी एखाद्या प्राण्यावर हल्ला करायचा ठरवला की, ते आपल्या तावडीतून त्याला सोडत नाहीत. हे तर आपल्या सगळ्यांना माहितंच आहे. त्यामुळे त्यांच्या तावडीतून शिकार सुटणं हे जवळ-जवळ अशक्यच आहे.
यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चित्याने हल्ला करुन देखील हरणावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या उलट हरिण स्वॅगमध्ये आपला चारा चरत राहिला आणि चित्ता त्याचं काहीही करु शकला नाही.
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, हे कसं शक्य आहे? चित्याने कसं काय हरणाला काहीही केलं नाही? तर यासाठी तुम्ही व्हिडीओ पाहा तुम्हाला संपूर्ण घटना लक्षात येईल.
या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, हरणाला पाहताच चित्ता त्याच्यावर हल्ला करतो. पण अचानक त्याच्या लक्षात आले की, हरणाची शिकार करणे त्याच्यासाठी अवघड नसून अशक्य आहे. कारण भाऊ, हरिण आणि चित्ता यांच्यामध्ये लोखंडी कुंपण आहे.
Window shopping by Cheetah… pic.twitter.com/x3p7PvdNS6
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 12, 2022
चित्ताला सुरुवातीला याची माहिती नसते. परंतु हरीणाला हे चांगलेच माहित असतं, ज्यामुळे चित्ताला समोर पाहूनही तो अगदी निवांत दिसते. होय, त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही, तो फक्त आनंदाने गवत चरताना दिसत आहे.
ही मनोरंजक क्लिप IFS सुशांत नंदा यांनी 12 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केली होती. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की विंडो शॉपिंग बाय चित्ता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वारंवार ट्विटर युजर्सही त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.