Bank Job: सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही; 'असा' करा अर्ज

Central Bank Recruitment 2024:  सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Dec 29, 2024, 01:46 PM IST
Bank Job: सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही; 'असा' करा अर्ज title=
सेंट्रल बॅंक भरती

Central Bank Recruitment 2024:  बॅंकेतील नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी. येथे चांगल्या पगारासोबत सुट्ट्यादेखील मुबलक मिळतात. त्यामुळे बहुतांश तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असतात. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांशी संबंधित पात्रता असलेला कोणताही उमेदवार सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइट  centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीतून एकूण 62 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, दिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

पदभरतीचा तपशील 

डेटा अभियंता/विशेषज्ञ ची 3 पदे,डेटा सायंटिस्टची 2 पदे,डेटा आर्किटेक्ट/क्लाउड आर्किटेक्ट/डिझायनर/मॉडेलरची 2 पदे,एमएल ऑप्स अभियंताची 2 पदे,एआय स्पेशलिस्टची 2 पदे,कॅम्पेन मॅनेजर (SEM आणि SMM) चे 1 पद,एसइओ स्पेशलिस्टचे 1 पद,ग्राफिक डिझायनर आणि व्हिडिओ संपादकचे 1 पद, कंटेट रायटर (डिजिटल मार्केटिंग)चे 1 पद,मार्टेक स्पेशालिस्टचे 1 पद, निओ सपोर्ट आवश्यकता (L2)ची 6 पदे,निओ सपोर्ट (L1)ची 10 पदे,उत्पादन सहाय्यक/तांत्रिक सहाय्यक इंजिनीअरची 10 पदे,डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशन सहाय्यक इंजिनीअरची 10 पदे आणि डेव्हलपर/डेटा सहाय्यक इंजिनीअरची 10 पदे भरली जाणार आहेत. सेंट्रल बँकेच्या या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना पदासाठी लागणारी पात्रता अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. 

निवड प्रक्रिया

सेंट्रल बँकेत अर्ज करणाऱ्या  सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांकडून 750 रुपये अधिक जीएसटी इतकी रक्कम घेतली जाईल. SC/ST/PWBD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. सेंट्रल बँकेच्या या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.मुलाखत  एकूण 100 गुणांची असेल. ज्यामध्ये सामान्य/EWS श्रेणीसाठी किमान 50% गुण आणि SC/ST/OBC/PWBD श्रेणीसाठी 45% गुण आवश्यक असतील. अंतिम निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अर्जाची शेवटची तारीख

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असलेले कोणीही 12 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. दिेलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा