नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोन्याच्या चकाकीसंबंधाने आणकी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोनन्याची झळाळी आणखीच वाढणार आहे.
या पुढे 24 कॅरेटच्या सोन्यासाठी नवा हॉलमार्क तयार करण्यात येणार आहे. ग्राहक व्यवहार केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी बुधवारी भारतीय मानक ब्यूरोला (बीएसआय) 24 कॅरेटच्या सोन्यापासून बनविण्यात येणाऱ्या दागिन्यांसाठी हॉलमार्क मानक तयार करण्याबाबत सूचना दिल्या. पासवान यांनी म्हटले की, सोन्याची गुणवत्ता प्रमाणीकरण (हॉलमार्कींग) करण्याबाबत लवकच निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार त्यावर काम करणार आहेत.
सध्यास्थितीत 14, 18 आणि 22 कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्यापासून बनविण्यात आलेल्या दागिन्यांसाठी हॉलमारकिंगसाठी बीआयएसचे मानक आहे. पासवान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान सांगितले की, 'या आधी 24 कॅरेटपासून सोने बनत नसे. मात्र, आता विदेशात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे असे करणे शक्य झाले आहे. त्यामुळे 24 कॅरेटच्या सोन्याबाबतही हॉलमार्क अनिवार्य असण्याची मागणी पुढे येत आहे.'