सावधान... अवघ्या काही सेकंदांत तुम्हाला लागेल लाखोंचा चूना

टेक्नोलॉजीचा वापर चांगल्या कामासाठी करण्यात येतो. मात्र, याच टेक्नोलॉजीचा अनेकजण चुकीचा वापर करत आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 19, 2017, 06:54 PM IST
सावधान... अवघ्या काही सेकंदांत तुम्हाला लागेल लाखोंचा चूना title=
Representative Image

नवी दिल्ली : टेक्नोलॉजीचा वापर चांगल्या कामासाठी करण्यात येतो. मात्र, याच टेक्नोलॉजीचा अनेकजण चुकीचा वापर करत आहेत.

ऑनलाईन फसवणुकीसाठीही सध्या याच टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येत आहे. ऑनलाईन फसवणुकीसाठी सध्या फोन कॉल्सचा वापर होत आहे. गुन्हेगार तुमच्यासोबत अवघे काही मिनिटं किंवा सेकंद फोनवर बोलुन तुम्हाला लाखोंचा चूना लावू शकतात.

हे गुन्हेगार तुम्च्यासोबत फोनवर भाष्य करत असताना अनेक प्रकारच्या ऑफर्सचं आमिष दाखवत तुम्हाला गुंतवूण ठेवतात आणि मग हळूच तुमच्याकडून वैयक्तीक माहिती काढण्यास सुरुवात करतात.

त्यानंतर हळू-हळू तुमच्याकडून तुमच्या बँक अकाऊंटची माहिती काढून घेतात. त्यानंतर तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करतात. पण, जर तुम्ही काही साध्या गोष्टींचं पालन केलं तर तुम्हा यापासून नक्कीच वाचू शकता.

स्वत:ला बँकेचे अधिकारी सांगतात

फोनच्या माध्यमातून नागरिकांना फसवण्यासाठी आरोपी फोन केल्यावर तुम्हाला बँकेचे अधिकारी बोलत असल्याचं सांगतात. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्हालाही अज्ञात नंबर किंवा व्यक्तीचा फोन आला तर सावध रहा. 

'ही' काळजी घ्या

जर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीने तुमची वैयक्तिक माहिती मागितली तर, अशी माहिती अनोळखी व्यक्तीला चुकूनही देवू नका. जर चुकून अशी माहिती दिली गेली तर तात्काळ बँकेशी संपर्क साधून तुमचं बँक अकाऊंट ब्लॉक करण्यासंदर्भात बोला. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमच्या अकाऊंटमधील रक्कम त्या आरोपीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर होऊ शकते.

पोलिसांना द्या माहिती

अशी घटना तुमच्यासोबत झाली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. योग्यवेळी पोलिसांना माहिती दिल्यास आरोपी गजाआड करण्यास पोलिसांनाही मदत होते. तसेच तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसेही सुरक्षित राहतात.