Loan Recovery: जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी नाईलजास्तव बँकेकडून कर्ज (Bank Loan) घ्यावं लागतं. होम लोन, कार लोन किंवा घरगुती इलेक्ट्रिक वस्तू ईएमआयवर (EMI) घेतल्या जातात. या कर्जाचे हफ्ते प्रत्येक महिन्याच्या ठरावीक तारखेला भरावे लागतात. पण अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते. तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. अशा परिस्थितीत पुढच्या वेळी तुम्हाला बँकेकडून कर्ज सहजासहजी मिळत नाही. अनेकदा चारचौघात अब्रू जाईल या भीतीने डिफॉल्टर टोकाचं पाऊल उचलतात. यासाठी नियम माहिती असणं आवश्यक आहे. बँकेनं पैशांच्या हफ्त्यासाठी धमकी दिल्यास पोलिसात तक्रार (Police Complaint) किंवा न्यायालयात (Court) दाद मागता येते. पटियाला हाउस कोर्टातील वकील महमूद आलम यांच्या मते दोन ईएमआय न भरल्यास बँक पहिल्यांदा रिमांइडर पाठवते. तीन हफ्ते चुकवल्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवते. त्यानंतरही कर्जाचे हफ्ते न भरल्यास बँक डिफॉल्टर घोषित करते.
सुप्रीम कोर्टाने कर्जाच्या वसुलीसाठी धमकवणं किंवा त्रास देणं गुन्हा असल्याचं सांगितलं आहे. जर एखादी व्यक्ती यासाठी तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. ईएमआय न भरणं हे सिव्हिल कायद्यांतर्गत येतं. त्यामुळे डिफॉल्टरसोबत बँक किंवा रिकव्हरी एजंट मनमानी करू शकत नाही. रिकव्हरी एजंट कोर्टातून दावा दाखल करून पैशांसाठी दाद मागू शकतो.
Post Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
आरबीआयच्या मते, रिकव्हरी एजंट डिफॉल्टरला सकाळी 8 पूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर कॉल करू शकत नाही. त्याचबरोबर धमकी देणारा मेसेज पाठवू शकत नाही. दुसरीकडे कर्ज न भरण्याचं कारण व्यवस्थितरित्या कोर्टात मांडता आलं तर तुरुंगवासही होत नाही. कर्जदाराचा अचानक मृत्यू झाला आणि बँकेने आधीच कर्जाचा विमा उतरवला असेल. तर पैसे कर्जदाराच्या कुटुंबाकडून घेतले जातात. कर्जवसुली करताना पोलिसांना सोबत असणं आवश्यक आहे.