टाटाच्या कारबद्दल काय वाटतं? आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितले, "असा प्रतिस्पर्धी..."

एका ट्विटर युजर्सने त्यांना टाटा मोटर्सबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.

Updated: Jul 12, 2022, 01:11 PM IST
टाटाच्या कारबद्दल काय वाटतं? आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितले, "असा प्रतिस्पर्धी..." title=

What Anand Mahindra Feel About Tata Motors: महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांच्या ट्वीटची नेटकरी आतुरतेने वाट पाहात असतात. या माध्यमातून आनंद महिंद्रा नेटकऱ्यांशी संवाद साधत असतात. अनेकदा ते नेटकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील देतात. अलीकडेच एका ट्विटर युजर्सने त्यांना टाटा मोटर्सबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तर दिले आहे. त्यांचं उत्तर वाचून तुम्हीही खूश व्हाल.

एका ट्विटर वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांना विचारले की, "सर, टाटाच्या वाहनांबद्दल तुमचे मत काय आहे?" उत्तरात आनंद महिंद्रा यांनी लिहिले, "टाटा मोटर्ससारखा चांगला प्रतिस्पर्धी मिळणे, आमचं भाग्य आहे. ते नेहमी स्वत:ला रिइंवेंट करतात. त्यामुळे आम्हाला अधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळते. स्पर्धेमुळे नाविन्य निर्माण होते."

अलीकडेच, एका ट्विटर वापरकर्त्याने त्यांना महिंद्रा स्कॉर्पिओ-एनच्या नावाबद्दल विचारले होते की त्याच्या नावात स्कॉर्पिओसोबत पुढील एन का जोडले गेले आहे, त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी इतर वापरकर्त्यांना याचे उत्तर देण्यास सांगितले होते. यानंतर, ट्विटर वापरकर्त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यापैकी अनेकांनी बरोबर उत्तरं दिली होती. अशा उत्तरांना आनंद महिंद्रा यांनीही प्रत्युत्तर दिले होते.