'लैंगिक इच्छा भागवण्यासाठी जोडीदाराकडे...'; हायकोर्टाकडून 'त्या' प्रकरणात पतीची निर्दोष मुक्तता

High Court Comment On Sexual Urges: या प्रकरणामध्ये महिलेने पतीविरुद्ध हुंडा मागत असल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 15, 2024, 10:31 AM IST
'लैंगिक इच्छा भागवण्यासाठी जोडीदाराकडे...'; हायकोर्टाकडून 'त्या' प्रकरणात पतीची निर्दोष मुक्तता title=
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दिला निकाल (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

High Court Comment On Sexual Urges: अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका व्यक्तीविरोधातील हुंड्याचा गुन्हा मागे घेण्याचे आधेश दिले आहेत. खासगी वादातून या व्यक्तीविरोधात हुंडा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं निरीक्षक न्यायालयाने नोंदवलं. "सभ्य समाजामध्ये आपल्या लैंगिक इच्छा भागवण्यासाठी एखादी व्यक्ती त्याच्या पार्टनरकडे नाही जाणार तर कुठे जाणार?"असा प्रश्नही न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना उपस्थित केला.

...म्हणून फेटाळली याचिका

न्यायमू्र्ती अनिश कुमार गुप्ता यांनी प्रांजल शुक्ला आणि अन्य दोघांविरुद्ध दाखल करण्यात आलेली हा याचिका फेटाळून लावत गुन्हा मागे घेण्याचे निर्देश दिलेत. या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले पुरावे आणि एफआयआरमध्ये याचिकाकर्त्याचा जबाब या दोन्ही गोष्टी परस्परांशी जुळत नसल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. 

लैंगिक संबंधांवरुन वाद

तसेच न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण या जोडप्यामध्ये लैंगिक संबंधांवरुन सुरु असलेल्या वादामुळे निर्माण झाल्याचंही निरीक्षण नोंदवलं. महिलेचा काही लैंगिक कृतींना आक्षेप असल्याने तिने पतीविरुद्ध तक्रार नोंदवल्याचं युक्तीवादानंतर न्यायालयाच्या निदर्शनास आलं. महिलेने केलेले आरोप हे हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचं सिद्ध करत नाही, असं उच्च न्यायालयाने सांगितलं. या आरोपांवरुन दोघांमध्ये वैयक्तिक मतभेद असल्याचं दिसून येत आहे, असंही न्यायालयाने म्हटलं.

तक्रारीमध्ये खोटे आरोप

"लैंगिक विषयांसंदर्भातील मतभेदांच्या मुद्द्यावरुन दोन्ही गटांमध्ये हा वाद असल्याचं दिसून येत. याच वादातून रागाच्या भरता एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये खोटे आरोप करण्यात आले आहेत. ज्यामध्ये हुंडा मागतिल्याचाही दावा करण्यात आल्याचं दिसत आहे," असं न्यायालयाने म्हटलं.

त्यात गैर काय आहे?

"पुरुषाने त्याच्या पत्नीकडून लैंगिक इच्छासंदर्भात मागणी केली आणि पत्नीलाही पतीकडून अशीच अपेक्षा असेल तर त्यात गैर काय आहे? एकेमकांच्या लैंगिक इच्छा भागवण्यासाठी जोडीदार सभ्य समाजात अन्य कुणाकडे जाणार?" असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

पॉर्न फिल्म पाहून पत्नीबरोबर...

या प्रकरणामध्ये याचिकार्त्या मीना शुक्ला यांनी त्यांचे पती प्रांजल शुक्ला यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. पती आपल्याबरोबर गैरवर्तवणूक करतो, आपल्याला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास आणि पॉर्नोग्राफिक व्हिडीओ पाहण्यास भाग पाडतो असं या महिलेचं म्हणणं होतं. दाखल केलेल्या तक्रारीमध्ये प्रांजल मद्यपान करुन पॉर्न फिल्म पाहून पत्नीबरोबर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करायचा असं म्हटलं आहे. मात्र या गोष्टीला पत्नीने नकार दिला तरी तो तिचं काहीही ऐकायचा नाही असंही तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारीमध्ये पती पत्नीला सोडून एकटाच सिंगापूरला निघून गेल्याचाही उल्लेख आहे.

रागातून दाखल केला एफआयआर

या महिलेने आपल्या सासरच्या लोकांविरूद्धही गुन्हा दाखल करताना हुंड्यासाठी आपला छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. लग्नापूर्वी हुंडा मागण्यात आला नव्हता. मात्र लग्नानंतर आपला हुंड्यासाठी छळ झाल्याचं सांगत तिने पतीबरोबरच मधू शर्मा आणि पुण्य शील शर्मा या दोघांविरुद्ध हुंडाविरोधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली. 

एफआयआर रद्द करत काय म्हटलं?

न्यायालयाने पतीविरोधातील हा एफआयआर रद्द करत, "न्यायालयाला असं दिसून आलं आहे की अर्जदाराविरुद्ध कोणत्याही आधाराशिवाय हुंडा घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत," असं म्हटलं.