Election results 2019 : 'ईव्हीएममध्ये नव्हे, तर हिंदूंच्या विचारसरणीत फरक झाला'

हिंदूंच्या विचारसरणीविषयी असदुद्दीन ओवेसींचं लक्षवेधी विधान   

Updated: May 23, 2019, 07:31 PM IST
Election results 2019 : 'ईव्हीएममध्ये नव्हे, तर हिंदूंच्या विचारसरणीत फरक झाला' title=

नवी दिल्ली : भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या पारड्यात यंदाच्या निवडणुकांचे कल गेल्याचं पाहायला मिळालं ज्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपच्या उमेदवारांना यश मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं. संपूर्ण देशभरात ५४२ जागांसाठी यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. ज्याचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्याचविषयी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

भाजपाच्या सत्तेची लाट असतानाही ओवेसी यांच्या बालेकिल्ल्याला मात्र जराही धक्का लागलेला नाही. पण, तरीही ओवेसी यांनी थेट शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगाने आतातरी त्यांचं स्वातंत्र्य दाखवून द्यावं असं म्हटलं आहे. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार व्हीव्हीपॅटमुळे काहीच फेरफार किंवा घोळ झाला नसल्याचंच ओवेसी यांनी स्पष्ट केलं. फेरफार हा ईव्हीएम यंत्रात झाला नसून, हिंदूंच्या विचारसणीत झाल्याची बाब त्यांनी सर्वांसमोर ठेवली आहे. ओवेसींचं हे वक्तव्य पाहता आता अनेकांनीच त्यावर प्रतिक्रियाही देण्यास सुरुवात केली आहे. एकिकडे देशाच्या उत्तर भागात भाजपाची लाट आली असतानात दक्षिणेकडील राज्यांमध्ये मात्र हे कमळ फुललेलं नाही. तेलंगणातील हैदराबाद मतदार संघावरही ओवेसी यांचं वर्चस्व कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.