Adhir Ranjan Chowdhury Parliament speech: तुम्ही देशद्रोही आहात, असं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर सडकून टीका केली. त्यावेळी त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर सध्या विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणल्याने आता सरकारला उत्तर द्यावं लागत आहे. अशातच नरेंद्र मोदी आज लोकसभेत सर्वांच्या प्रश्नाला उत्तर देतील. अशातच काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टोकदार शब्दात टीका केली. अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद्र मोदींची तुलना निरव मोदीशी केली. त्यावरून जोरदार गदारोळ झाल्याचं दिसून आलं.
जिथं राजा आंधळा असतो, तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली. तुम्ही पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारे सभागृहात बोलू शकत नाही, असं म्हणत त्यांनी अधीर रंजन चौधरी यांना सुनावलं आहे.
पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीत काहीतरी बोलतात. पण मणिपूरबाबत ते गप्प आहेत. आम्हाला ते अजिबात आवडत नाही. मणिपूरमधून दोन खासदार आहेत. त्यांना बोलण्याची संधी देता येत नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केलीये. तुम्ही बफर झोनमध्ये सुरक्षा दल तैनात केल्याचे सांगितलं. नियंत्रण रेषेत बफर झोन तयार होतात, म्हणजे आपण स्वीकारत आहात याचा अर्थ काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
अविश्वास ठरावाची ताकद बघा, आम्ही पंतप्रधान मोदींना खेचून सभागृहात आणलं. ही संसदीय परंपरांची ताकद आहे. मणिपूरवरील चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभागी व्हावें, अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी सभागृहात न येण्याची शपथ का घेतली होती? अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आम्ही यापूर्वी विचार केला नव्हता, परंतु आम्हाला आणावा लागला, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.
#WATCH | Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi says "...Baseless allegation against the Prime Minister cannot be accepted. This should be expunged and he should apologise" https://t.co/F5sD2IW0Kj pic.twitter.com/NgKqfPtaNx
— ANI (@ANI) August 10, 2023
देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या लोकांसमोर आपले विचार मांडायला हवे होते. आमची ही मागणी चुकीची मागणी नव्हती. ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी होती. मोदी 100 वेळा देशाचे पंतप्रधान झाले, आमचं काही म्हणणं नाही. देशातील जनतेशी संवाद साधावा लागतो, असंही अधीर रंजन म्हणाले आहेत.