केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 8 व्या वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

7th Pay Commission |  तुम्ही केंद्र सरकारचे (Central Government Employees) कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी

Updated: May 18, 2022, 08:19 AM IST
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 8 व्या वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट title=

मुंबई : 7th Pay Commission: तुम्ही केंद्र सरकारचे (Central Government Employees) कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केले जात आहेत. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळत असतो. परंतू याबाबत लवकरच सरकार कर्मचाऱ्यांना खूशखबर देणार आहे...

सरकारची नवीन प्रणाली

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नवीन फॉर्म्युला आणला जाऊ शकतो. यापूर्वी माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी जुलै 2016 मध्येच म्हटले होते - 'कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी आता वेतन आयोगाकडून (Pay Commission) नवीन स्केल यायला हवे.'

अर्थ मंत्रालयाच्या (Finance ministry) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार अद्यापतरी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग आणण्याचा विचारात नाही. आता सरकार अशा प्रणालीवर काम करत आहे ज्याद्वारे कर्मचार्‍यांचे पगार त्यांच्या परफॉमन्सच्या आधारावर ठरवले जाईल.

8 व्या वेतन आयोगाबाबत निर्णय

झी बिझनेसला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानंतर आता पुढील वेतन आयोग येणे कठीण आहे. सरकारला आता अशी प्रणाली आणायची आहे ज्यामध्ये 68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख निवृत्ती वेतनधारकांचा डीए 50% पेक्षा जास्त असल्यास पगारात ऑटोमैटिक रिविजन होईल. सरकारला यासाठी 'ऑटोमैटिक पे रिविजन सिस्टम' बनवायची आहे.