टोल प्लाझावरील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. एक नाही दोन नाही तब्बल 200 टोल प्लाझावर 120 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच उघड झालाय. महाष्ट्रासह 12 राज्यातील 200 टोल प्लाझावर गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांच्या पैशांवर हे चोरटे डल्ला मारत होते. उत्तर प्रदेश एसटीएफने NHAI च्या अतराइला टोल प्लाझावर छापा टाकून देशभरात पसरलेल्या टोल संकलन नेटवर्कमधून 120 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. लखनऊ एसटीएफने मंगळवारी मिर्झापूरच्या लालगंज इथे अतराइला टोल प्लाझावर छापा टाकून टोल व्यवस्थापकासह 4 जणांना अटक करण्यात आलीय. एसटीएफने आरोपींकडून 5 मोबाईल, दोन लॅपटॉप, प्रिंटर आणि 19 हजार रुपये जप्त केले आहेत. एसटीएफचे निरीक्षक दीपक सिंह यांनी सांगितलंय की, एनएचएआयच्या डझनभर टोल प्लाझावर अनियमिततेच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (200 toll plazas in 12 states Including maharashtra Natwarlal looted 120 crores of toll tax in two years)
एसटीएफच्या चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की 12 राज्यांमधील NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) च्या 200 टोल प्लाझावर अशा प्रकारची अनियमितता केली जात होती. एकट्या मिर्झापूरमधील अटराइला टोल प्लाझा येथे दररोज 40 ते 50 हजार रुपयांची अनियमितता पाहिला मिळाली आहे. ही अनियमितता दोन वर्षांपासून सुरू होती आणि अशा प्रकारे एकट्या अटराइला टोल प्लाझामध्ये 3 कोटी 28 लाख रुपयांचा गंडा घातला गेलाय.
फास्टॅग नसलेली वाहने आणि फास्टॅग खात्यात कमी पैसे वापरून टोल प्लाझाच्या संगणकातील NHAI च्या सॉफ्टवेअर सर्व्हरशी छेडछाड करून ही फसवणूक करण्यात आली आहे. एसटीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण रॅकेटमागील व्यक्ती आलोक नावाचा अभियंता आहे. जो NHAI चे सॉफ्टवेअर बनवण्याचे आणि स्थापित करण्याचे काम करतो. आलोक हा एमसीए आहे आणि पूर्वी तो फक्त टोल प्लाझावर काम करायचा. टोल प्लाझावर काम करत असताना तो टोल प्लाझाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्यांच्या कंत्राटदारांच्या संपर्कात आला.
आरोपी अभियंता आलोकने NHAI कंत्राटदार आणि टोल प्लाझा मालकांच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले. हे सॉफ्टवेअर टोलनाक्यांवर बसवण्यात आलेल्या कॉम्प्युटरमध्ये बसवण्यात आले होते आणि तो त्याच्या लॅपटॉपवर वापरत असे. या फसवणुकीत टोल प्लाझाचे कर्मचारी आणि आयटी कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
टोल प्लाझावर बसवण्यात आलेल्या संगणकांमध्ये बसवलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आला. फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून आणि फास्टॅग खात्यात कमी पैसे असलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल टॅक्स वसूल करण्यात आला. फास्टॅगशिवाय वाहनांकडून जमा होणाऱ्या टोल टॅक्सपैकी 5% रक्कम NHAI च्या मूळ सॉफ्टवेअरमधून वसूल करण्यात आली आहे, जेणेकरून फास्टॅगशिवाय वाहनांचा टोल टॅक्स खात्यात जात नसल्याची फसवणूक झाल्याचा संशय कुणालाही येऊ नये. तर नियम असा आहे की फास्टॅग शिवाय वाहनांकडून वसूल केलेल्या कराच्या 50% रक्कम NHAI च्या खात्यात जमा करावी लागेल. याशिवाय वाहन शुल्कमुक्त श्रेणीत दाखवून व त्याची स्लिप NHAI च्या सॉफ्टवेअर सारखीच असल्याचे दाखवून वाहनांकडून अवैध वसुलीही करण्यात आली.
अटक करण्यात आलेले अभियंता आलोक म्हणाले की, अशाप्रकारे 200 हून अधिक टोल स्टेशनवर त्यांनी बसवलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला जात होता आणि हा पैसा टोलनाक्यावर वर्ग केला जात होता. मालक, आयटी कर्मचारी आणि कर्मचारी यांच्यात वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, जम्मू-काश्मीर, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड आणि यूपीच्या आझमगड ते गोरखपूर या राज्यांचा समावेश असून हे रॅकेट गेल्या 2 वर्षांपासून सुरू होते.