Best Ideas : अनेकदा तुम्हाला सर्वात चांगली कल्पना (Best Idea) कुठे आलेली असते?, कधी विचार केलाय का? जर याचं उत्तर देयचं झालं तर 'बाथरूम'मध्ये असंच उत्तर अनेकजण देतील. पण बाथरूममध्येच का? याचं उत्तर अनेकांना देता येत नाही. अशातच यावर वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास केला गेला. त्यानंतर नेमकं असं का होतं, याचं उत्तर मिळालं आहे. (Why do good ideas come in the bathroom)
बाथरूममध्येच चांगल्या कल्पना का सुचतात?, यावर अभ्यास केला गेला. यावर दोन पद्धतीने संशोधन झालं. त्यानुसार काही गोष्टी समोर आल्या आहेत. व्हर्जिनिया विद्यापिठातील फिलॉसॉफी ऑफ कॉग्रीटिव्ह सायन्सचे संशोधक जॅक इरविंगने (Jack Irving) पहिला प्रयोग केला गेला.
बिनकामाचं कॅन्सेंट्रेशन तुमच्या कल्पनाशक्तीला (Idea) किंवा तुमच्या बुद्धीक विकासाला (Intellectual development) विरोध करते. त्यामुळे तुम्ही मोकळा विचार करू शकत नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं समाधान पाहिजे असेल तर तुम्ही सतत विचार करण्याऐवजी ब्रेक घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. ज्यावेळी तुम्ही अंघोळ करत असता. त्यावेळी तुम्ही बाथरूमच्या (Bathroom Ideas) वातावरणामुळे तुमचं डोकं फ्रेश होतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दबावाशिवाय सर्वबाजूने विचार करता. त्यामुळे तुम्हाला बाथरूममध्ये चांगल्या कल्पना (Secret behind good ideas) मिळतात.
बाथरूममध्ये अंघोळ करतानाच नाही तर वॉकिंग करताना किंवा बागकाम करताना तुम्हाला चांगल्या आयडिया सुचतात. ही कामं कमी प्रमाणात तुम्हाला व्यस्थ ठेवतात. कमी प्रमाणात व्यस्थ असणारी कामं मेंदूला चालना देतात आणि त्यामुळे तुम्हाला नवनवीन आयडिया सुचतात. जॅक इरविंग यांचं संशोधन समोर येण्याआधी याला शॉवर इफेक्ट (Shower Effect) नावाने संबोधलं जात होतं.
दरम्यान, त्यावेळी तुमचं डोकं फ्री होतं. त्यावेळी तुम्हाला चांगल्या कल्पना सुचतात. मग तुम्ही जेवण करत असाल किंवा बाथरूममध्ये अंघोळ करत असाल, रिलॉक्स (Relax) वाटेल, त्यावेळी तुम्हाला चांगल्या कल्पना येतात. सायकोलॉजी ऑफ एस्थेटिक्स, क्रिएटिव्ही एन्ड द आर्ट्स या मासिकामध्ये यावर निबंध प्रकाशित झाला आहे.
आणखी वाचा - तिखट, झणझणीत, मसालेदार हिरव्या मिरचीचे एक नाही तर अनेक फायदे! जाणून घ्याच