Omicron सोबत लढण्यासाठी हे 8 सुपरफुड करतील इम्यूनिटी वाढवण्यात मदत, कसं ते जाणून घ्या

डॉक्टरांनी अशा गोष्टीचे सेवन करायला सांगितले आहे, ज्यामुळे ते इम्युनिटी बुस्टर डोस सारखे काम करत आहेत.

Updated: Jan 3, 2022, 06:25 PM IST
Omicron सोबत लढण्यासाठी हे 8 सुपरफुड करतील इम्यूनिटी वाढवण्यात मदत, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : थंडीचा हंगाम सुरू होताच कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातच काय तर देशात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. जगभरात ओमिक्रॉनची प्रकरणे देखील वेगाने वाढत आहेत. भारतात Omicron संसर्गाची 1 हजार 500 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी लोकांना सतत कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच डॉक्टर देखील रुग्णांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टी खाण्यास सांगत आहेत.

डॉक्टरांनी अशा गोष्टीचे सेवन करायला सांगितले आहे, ज्यामुळे ते इम्युनिटी बुस्टर डोस सारखे काम करत आहेत.

तूप

आयुर्वेदानुसार तूप हे सर्वात सहज पचणारे फॅट आहे. तूप केवळ तुमच्या शरीराला उबदार ठेवत नाही तर त्वरित ऊर्जा देते. तूप आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि त्वचेला तडे किंवा कोरडे होण्यापासून वाचवते. तुम्ही हे रोटी, डाळ, भात किंवा भाजीसोबत खाऊ शकता.

रताळे

व्हिटॅमिन-ए, पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्वांनी समृद्ध रताळे केवळ बद्धकोष्ठता आणि जळजळ यापासून आराम देत नाहीत तर रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवण्यात मदत करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले असते. तज्ज्ञांच्या मते, रताळ्याचा तुकडा दिवसभर शरीरातील बीटा कॅरोटीन भरून काढण्यासाठी पुरेसा असतो. तुम्ही ते नुसते खाऊ शकता किंवा दुधासोबतही त्याला खाल्ले जाते

गूळ

काढ्याच्या स्वरुपात गुळाचे सेवन करणं हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम सूत्र आहे. तसेच सर्दीपासून लवकर आराम मिळतो. गुळातील लोह, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम आणि पोटॅशियम यांसारखे फायदेशीर घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

आवळा

आवळा हे व्हिटॅमिन-सी समृद्ध असलेले रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ आहे, जे हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. आवळा हे जाम, लोणचे, रस, चटणी किंवा पावडरच्या रूपात सेवन केले जाऊ शकते. यामध्ये आढळणारे सर्व पोषक तत्व शरीराला खूप फायदे देतात.

बाजरी

भरपूर पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसाठी बाजरी खूप फायदेशीर गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, बाजरीत असलेले व्हिटॅमिन-बी स्नायूंना मजबूत करते आणि हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करते. बाजार आणि नाचणी यासारख्या गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.

खजूर

केकपासून शेकपर्यंत अनेक गोष्टींमध्ये खजूर वापरतात. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. खजूरमध्ये आढळणारे कॅल्शियम हाडांना आणि दातांसाठी फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, खजूर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील खूप चांगले आहेत.

आलं

आल्यामध्ये असलेले ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म घसादुखीपासून आराम देण्याचे काम करतात. एवढेच नाही तर अदरक रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवू शकते. हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, पचन समस्या आणि मळमळ या समस्यांमध्ये आराम देते.

लिंबूवर्गीय फळे

मोसंबी, संत्री किंवा लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे खाण्यास विसरू नका. हिवाळ्यात मिळणाऱ्या या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सीचे प्रमाण सर्वाधिक असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते. हिवाळ्यात तुम्ही त्यांचे नियमित सेवन करावे.