'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट, जाणून घ्या

स्वभावाने हुशार,तल्लक बुद्धी, तिक्ष्ण स्मरणशक्ती असते 'या' रक्तगटांच्या लोकांमध्ये, वाचा तुमचा ब्लड ग्रुप आहे का? 

Updated: Jul 25, 2022, 05:17 PM IST
'या' रक्तगटाचे लोक असतात सर्वात स्मार्ट, जाणून घ्या title=

मुंबई : प्रत्येकालाच असे वाटत असते की, तो हूशार असावा, त्याच्यासारखी बुद्धी कोणाकडेच नसावी. मात्र या गोष्टीच गुपित तुमच्या ब्लड ग्रुपमध्ये असतं. तुमचा ब्लड ग्रुप ठरवतो असतो की तुम्ही किती हुशार आणि बुद्धिमान आहात ते. त्यामुळे जाणून घेऊयात कोणत्या ब्लड ग्रुपचे व्यक्ती स्मार्ट असतात.  

 B+ ब्लड ग्रुप : 

कॅलिफोर्निया विद्यापीठात रक्तगटावर एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये असे आढळून आले की सर्व रक्तगटांपैकी 'बी पॉझिटिव्ह रक्तगट' असलेल्या लोकांचा मेंदू सर्वात वेगवान असतो. या संशोधनात असे सांगण्यात आले की, बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांची विचारशक्ती इतर लोकांपेक्षा चांगली असते. ज्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे अशा लोकांच्या मेंदूमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोबचे सेरेब्रम अधिक सक्रिय असतात, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि मेंदू सक्रिय राहतो.

O+ ब्लड ग्रुप :
ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेले लोक दुसऱ्या क्रमांकावर येतात. या लोकांचे मनही खूप तेज असते. या रक्तगटाच्या लोकांचे रक्ताभिसरण इतरांपेक्षा चांगले असते. त्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहून स्मरणशक्ती चांगली राहते. 

संशोधन काय सांगते?

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी रक्तगटाच्या संदर्भात एक संशोधन केले आहे. यामध्ये सर्व रक्तगटांच्या 69 लोकांचा अभ्यास करण्यात आला. या लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन संशोधन करण्यात आले आणि मानवी मेंदूबाबत माहिती गोळा करण्यात आली. या संशोधनात 'बी पॉझिटिव्ह' आणि 'ओ पॉझिटिव्ह' रक्तगटाच्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा वेगवान असल्याचे दिसून आले.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)