मुंबई : सकाळी उठल्यावर सारेच ब्रश करतात.परंतू जेवल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी नित्यनियमाने दात घासण्याची सवय सार्यांनाच असते असे नाही.
अनेकजण त्याचा कंटाळा करतात. ब्रशऐवजी मिंट, माऊथवॉशचा वापर करतात त्यांना या '5' कारणांसाठी आळस झटकून ब्रश करण्याची सवय लावणे गरजेचे आहे.
रात्री ब्रश करण्याच्या सवयीमुळे तोंडात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.तसेच प्लाग मुळे कॅव्हीटीज होत नाहीत. म्हणूनच झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत. यामुळे दातांत अडकलेले अन्नकण बाहेर पडण्यास तसेच तोंडाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
दोनदा ब्रश करण्याच्या सवयीमुळे तोंडाचे आरोग्य सुधारते सोबतच periodontal disease चा धोका कमी होतो. रात्री ब्रश करण्याच्या सवयीमुळे दातांवर टार्टर साचून राहणे कमी होते. यामुळे हिरड्यातील दाह आणि रक्त येण्याची समस्या कमी होते.
रात्री ब्रश न करण्याच्या सवयीमुळे तोंडाला येणारी दुर्गंधी वाढते. अन्नकणांवर वाढणारे बॅक्टेरिया कॅव्हिटीजचा धोका वाढवतात सोबतच काही केमिकल्सची निर्मिती करतात. यामुळे दुर्गंधी वाढते.
रात्री ब्रश करण्याची सवय तुम्हांला रिफ्रेश करते पण सोबतच रात्री अवेळी लागणारी भूक टाळण्यासही मदत होते. त्यामुळे अनावश्यक वाढणार्या कॅलरीजचा धोका कमी होतो.
तोंडाच्या आरोग्यावर हृद्याचे आरोग्यही अवलंबून असते. दातांवरील टार्टर आणि प्लाकवर वाढणारे बॅक्टेरिया रक्त्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करून क्लॉट्स ( रक्ताच्या गुठळ्या ) निर्माण करू शकतात. यामुळे अंतर्गत रक्तस्त्रावामुळे कार्डियोव्हास्क्युलर आजारांचा धोका वाढतो.