मुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी

मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू  या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत

Updated: Oct 10, 2022, 01:42 PM IST
मुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी  title=
mumbai conjunctivitis cases increased bmc health department is on alert

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai) साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू  या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडूनही (Health Department) नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (mumbai conjunctivitis cases increased bmc health department is on alert) ही साथ आहे conjunctivitis म्हणजेच डोळे येण्याची. 

बहुतांश मुंबईकरांमध्ये सध्या डोळ्यांची साथ पाहायला मिळाली आहे. सहसा अनेकांना एकाच डोळ्याला संसर्ग झाल्याची बाब समोर येतो. पण, कालांतरानं दोन्ही डोळ्यांपर्यंत हा संसर्ग पोहोचलेला असतो. सध्या स्क्रीनपुढे तासनतास बसणं, प्रदूषणामध्ये बराच काळ वावरणं या साऱ्यांचे थेट परिणाम डोळ्यांवरही होताना दिसतात. 

अधिक वाचा : वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs

 

डोळे आले आहेत हे ओळखायचं कसं? (conjunctivitis symptoms)
- डोळा सतत टोचणं, डोळ्यातून पाणी आणि घाण येणं. डोळे लालसर होणं. 
- झोपेतून उठल्यानंतर पापण्या चिकटणं, डोळ्यांतील घाण येण्याचं प्रमाण वाढणं. 
- डोळ्यांना खाज येणं, तीव्र प्रकाशामुळं त्रास होणं. 
- काही क्षणांसाठी धुसर दिसणं, काही प्रसंगी ताप- डोकेदुखीसारख्या समस्या सतावणं. 

अधिक वाचा : Depression मध्ये असणाऱ्या व्यक्ती Google वर सर्वाधिक काय Search करतात? 

 

मुंबईकरांनो काळजी घ्या.... (How to take care of conjunctivitis)
- डोळे आल्याच किमान चार ते पाच दिवस घराबाहेर पडू नका. घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
- घराबाहेर पडतच असाल तर, चष्मा किंवा गॉगलचा वापर करा. 
- बंद वातावरणात हा संसर्ग झपाट्यानं पसरतो. त्यामुळं डोळे आलेल्या व्यक्तीचा टिशूपेपर, कपडे, रुमाल किंवा इतर वस्तू वापरु नका. 
- डोळे सतत चोळू नका. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करु नका.