Ginger Powder For Health: आलं प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात मिळणारा आणि औषधी गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे. आयुर्वेदातसुद्धा आलं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आलं हे एक औषधी वनस्पती असून खाद्यपदार्थात चव वाढवण्यासाठी मसाले पदार्थ म्हणून त्याचा वापर गेला जातो. आल्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे, मँगनीज आणि क्रोमियम सारखे आरोग्यासाठी पोषक असणारे घटक आढळतात. यासोबतच, अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी कॅन्सरसारख्या गुणधर्मांमुळे आले आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
रोजच्या जेवणात स्वाद वाढण्यासाठी ताज्या आल्याचा वापर केला जातो. सुक्क्या आल्याची पावडर करुन बरेचसे आजार दूर करण्यासाठी आणि शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. ही पावडर अधिक काळ टीकते. म्हणूनच आवश्यकतेनुसार, याचे सेवन फायद्याचे ठरते. हिवाळ्यात तर रोज 1 चमचा आल्याची पावडर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना दूर ठेवते.
एक चमचा आल्याच्या पावडर मधून आपल्याला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स मिळतात. यामुळे आपली इम्युनिटी वाढण्यास मदत होते. या ऋतूत वाढत असलेल्या फ्लूला आल्याच्या पावडरीचे सेवन केल्याने दूर ठेवता येते.
आल्याची पूड शरीरातील भागावरील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 2009 मध्ये जर्नल ऑफ अल्टरनेटिव एंड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अध्ययनात स्नायूंच्या वेदनेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
आलं मेटाबॉलिजम वाढवण्यात मदत करते आणि भुकेला सुद्धा नियंत्रित ठेऊ शकते जेणेकरुन वजन कमी करण्यास मदत होते. 2015 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात आल्याचे गुणकारी फायदे नमूद केलेले आहेत. या अभ्यासानुसार आलं शरीरातील चरबी कमी होण्यास आणि मेटाबॉलिजममध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरु शकते.
हॉकिन्स मेडिसनच्या रिपोर्टनुसार, कॅन्सरच्या रोगावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, कीमोथेरेपीच्या उपचारानंतर रुग्णांना होणारी मळमळ थांबवते. तसेच मळमळ थांबवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे होणारे साइड इफेक्ट्सपासून वाचता येते.
हे ही वाचा: Health Care: २०२५ मध्ये आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा
आल्याचे सेवन हे डायबेटीज रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे ब्लड-शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी मदत होते. आल्यातील अँटी डायबेटीक गुणांमुळे डायबेटीजच्या रुग्णांना आल्याच्या पावडरचे सेवन खूपच फायद्याचे ठरते.
कोमट दूधासोबत तुम्ही आल्याच्या पूडचे सेवन करु शकता. या व्यतिरिक्त याला मध किंवा लिंबुसोबत चहा बनवून प्याल्यानेसुद्धा आरोग्यास अनेक फायदे मिळू शकतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)