मुंबई : शंख सगळ्यांनाच माहित आहे. शंख अनेकजण वाजवतात. पण, शंखनाद केल्यामुळं आजार बरे होतात, असा दावा करण्यात आला आहे. शंखनाद केल्यामुळं त्वचारोग बरे होतात. इतकंच नाही तर, सौंदर्य खुलतं असाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पडताळणी केल्यानंतर नेमकं काय सत्य समोर आलं, हे आपण जाणून घेऊयात. (fact check viral polkhol shankh more benfits for our health know what truth what false)
शंखनाद केल्यानं गंभीर आजार बरे होतात, असा दावा करण्यात आला आहे. शंख वाजवल्यानं आजार बरे होत असतील तर हे सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. त्यामुळं शंखनाद केल्यानं काय फायदे होतात हे जाणून घेणं गरजेचं आहे.
आरोग्यासह सौंदर्य खुलवण्यास उपयोगी असे कित्येक मिनरल्स शंखामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळं शंखनादानं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो असा दावा करण्यात आलाय.
आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड हे याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एक्सपर्टना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.
शंखनादामधून सकारात्मक ऊर्जा मिळून मन प्रसन्न होतं. शंखनाद केल्यास संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण आवश्यक त्या गतीने होतं. शंखनादामुळे रेक्टल स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात. गॅस आणि पोटाच्या आजारांपासून मुक्ती मिळते. रक्ताभिसरण योग्य गतीने झाल्याने त्वचाविकार दूर होतात.
शंखनाद केल्यानं चेहरा तजेलदार होण्यास मदतच मिळते. शंखात कॅल्शियम असल्याने त्यात दूध किंवा पाणी ठेवल्याने हाडंदेखील मजबूत व्हायला मदत होते.
शंखनादामुळे फुफ्फुसांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे आरोग्य सुधारतं. आमच्या पडताळणीत शंखनाद केल्यानं अनेक आजार बरे होतात हा दावा सत्य ठरला.