Research : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा

Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 21, 2024, 02:16 PM IST
Research : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा title=
drinking beer reduce cancer diabetes and Weight loss shocking study Health Benefits of Drinking Beer

Health Benefits of Drinking Beer : अल्कोहोलचे प्रमाण कमी असलेली बिअर बहुतेक लोकांना प्यायला आवडते. तरुण पिढीमध्ये बिअर पिणे हे स्टेट्स मानलं जातं. दुपार असो किंवा रात्र मस्त एक थंड बिअर प्यायला अल्कोहोल प्रेमी कायम तयार असतात. तुम्हाला माहितीये का बिअर ही यीस्टचा वापर करु बनवली जाते. त्यामुळे ती कॅन्सरशी लढण्यासाठी प्रभावी आहे, असा धक्कादायक अहवाल समोर आलाय. बिअर प्यायल्याने आरोग्यास फायदा मिळतो असं अनेक अहवाल सांगतात. या अभ्यासानुसार बिअर प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होतं, असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर मधुमेह, हृदयरोगाशीही लढण्यासाठी बिअर पिणे फायदेशीर मानली गेली आहे. अगदी वजन कमी करण्यासाठीही बिअर सेवनाचा फायदा मिळतो असं या अहवालात म्हटलंय. (drinking beer reduce cancer diabetes and Weight loss shocking study Health Benefits of Drinking Beer )

अहवालात काय सांगितलंय?

जर्मनीतील EMBL संशोधकांच्या सहकार्याने व्हर्जिनिया स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय की, यीस्ट पेशी कर्करोगाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, शिझोसॅकॅरोमायसेस पोम्बे (एस. पोम्बे), एक सामान्य ब्रुअरचे यीस्ट, पोषक तत्वांची कमतरता आणि विश्रांतीच्या परिस्थितीत हायबरनेट कसं करू शकतं. हे स्वतःच गेम चेंजर असल्याचे दिसून येतं आहे. 

बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? 

एक पिंट बिअर प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत असं या अहवालात सांगण्यात आलंय. बिअरची बाटली नियमित प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. त्यात कॅलरीज कमी असल्याने बिअरमध्ये आयसो-अल्फा अ‍ॅसिड असते, जे चरबी आणि ग्लुकोज चयापचयसाठी सकारात्मक असतं. बिअरसोबत नट खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते, असं निरिक्षणातून सांगण्यात आलंय. कारण त्यातून शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. अल्कोहोलसोबत अशा गोष्टी खाल्ल्याने शरीराला कमी कॅलरीज मिळतात. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, एक ग्लास रेड वाईन वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. शिवाय मेटाबॉलिक फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतं. 

शरीरातील इलॅजिक अ‍ॅसिड नावाचे रसायन काढून टाकण्यास मदत मिळते ज्यामुळे फॅट पेशींची वाढ मंदावते. शिवाय नवीन पेशी तयार होण्यास अडथळा निर्माण होतो. कमी प्रमाणात बीअर गर्भधारणेदरम्यान महिलांची हाडे मजबूत करते. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या अहवालानुसार, जे लोक दिवसातून दोन बाटल्या बिअर पितात त्यांच्यात हाडांची खनिज घनता मद्य न पिणाऱ्यांपेक्षा जास्त असते. जास्त दारू पिऊन फायदा नाही, हे खास करुन लक्षात घ्यायला हवं. बीअरमुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो, असंही या अभ्यासातून समोर आलंय. 

बिअरच्या सेवनाने उच्च रक्तदाबही कमी होतो. जे पुरुष आठवड्यातून सहा बिअर पितात त्यांना मधुमेहाचा धोका 21 टक्क्यांनी कमी होता, असा दावा या अभ्यासात करण्यात आलाय. बीअरमुळे हृदयाची गतीही सुरक्षित राहते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांच्या मते, बिअरच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि एनजाइनाचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो. पण ही गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे जास्त मद्यपान केल्याने यकृताचे आजार होऊ शकतात. जर्मन प्रोफेसर क्लॉस हेलरब्रँड यांच्या मते, अल्कोहोल-फ्री बिअर (हॉप्स नावाच्या वनस्पतीपासून बनवलेली) सेवन केल्याने यकृत निरोगी राहते. त्याचबरोबर या बिअरच्या सेवनाने कॅन्सरचा धोकाही कमी होतो. यामुळे यकृत आणि कोलन कर्करोगाच्या पेशी तयार होत नाहीत, असा दावाही यात अभ्यासात करण्यात आलाय. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)