नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या प्री-वेडिंगला सुरुवात; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'एका चांगल्या कुटुंबाला...'

Shobhita Dhulipala Naga Chaitanya Pre Wedding Function : शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात... फोटो शेअर करत अभिनेत्रीनं दिली चाहत्यांना बातमी

दिक्षा पाटील | Updated: Oct 21, 2024, 05:07 PM IST
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या प्री-वेडिंगला सुरुवात; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'एका चांगल्या कुटुंबाला...'  title=
(Photo Credit : Social Media)

Shobhita Dhulipala Naga Chaitanya Pre Wedding Function : बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. आता शोभितानं चक्क लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाचे अर्थात प्री-वेडिंगच्या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. तर काही नेटकरी त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत. 

शोभितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. शोभितानं शेअर केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. शोभितानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये प्री-वेडिंद सेरेमनीची एक झलक दाखवली आहे. शोभितानं एकत्र 10-12 फोटो शेअर केले आहेत. त्यात तिनं रेशमी गुलाबी साडी नेसली आहे. त्यासोबत सोन्याचे दागिने घातले आहेत. तर डोक्यात मोगऱ्याचा गजरा माळला आहे. तर तिच्या हातात हळद असल्याचं दिसतंय आणि कुटुंबाच्या दुसऱ्या सदस्यांसोबत ती या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. तर शोभितानं हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की गोधुमा रायी पसुपु अनुष्ठान आहे. अखेरीस त्याची सुरुवात झाली. त्यात ती दाक्षिणात्य परंपरेनुसार सगळ्या विधी करत असल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शोभितानं शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'सदा सौभाग्यवान रहा.' दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'तिचा श्राप कधीच तुझा पाठलाग सोडणार नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'एका चांगल्या कुटुंबाला मोडलंस तू.' आणखी एका नेटकऱ्यांनी तिच्या साधेपणाची आणि तिच्या सुंदरतेची स्तुती केली आहे. 

हेही वाचा : 'मी काही खाल्लं तर...'; करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीनं नवऱ्यावरच उगारला हात?

नागा चैतन्यचं शोभिता धुलिपालासोबत हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न हे समांथा रुथ प्रभूशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. तर 2021 मध्ये ते दोघं विभक्त झाले. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली होती. त्यानंतर नागा चैतन्यननं घटस्फोटानंतर एक मुलाखत दिली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं की घटस्फोटानंतर तो डिप्रेशनचा शिकार झाला होता. तर समांथानं सांगितलं होतं की त्यांनी बाळासाठी प्लॅनिंग केली होती. योग्यवेळ आल्यानंतर ते हे सगळं करणार होते पण काही झालं नाही.