चांगली झोप घेतली तर आपण सुद्धा फ्रेश असतो, पण लहान मुलांनी किती झोप घ्यावी हे माहीत नसते. त्यामुळे ते जास्त झोपतात तर कधी कमी झोपतात. काही लहान मुलं रात्रीचे जागरण करतात आणि हे सतत चालू राहीलं तर त्यांचा नकळत त्यांचा स्वभाव बदलू लागतो ते चिडचिड करू लागतात. पण चांगली झोप झाली असेल तर मुलांमध्ये बदल होऊ लागतात त्यांचे मानसिक संतुलन ठिक होऊ लागते आणि स्वभावातही बदल होऊ लागतात त्यांना त्यांचा भावना नियंत्रणात ठेवता येऊ लागतात. अमेरिका मधील पेन्सिलवेनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी शोध घेतल्यावर असे दिसून आले, 6 वर्षाच्या 143 मुलांच्या झोपण्याचा डेटा गोळा केला. या मुलांच्या आईला अडीच वर्ष 'रोस्पोन्सिव्ह पॅरेंटिंग' बद्दल शिकवले गेले की, त्यात मुलांच्या भावना आणि शारीरिक गरजांबद्दल शिकवलं. यात झोपण्याचं वातावरण बनवलं जातं आणि मुलांना थापटवून किंवा हळू-हळू झुलवत झोपवायचा प्रयोग करावा.
भावनेचे नियंत्रण
नियमित झोपणारी मुलं आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवू लागले होते. चिडचिड कमी होऊ लागली. त्यांच्या वागणुकीत चांगला बदल होत गेला. पेन्सिलवेनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या बायोबिहेवियरल हेल्थच्या अनुसार नियमित झोपणाऱ्या मुलांची वागणूक चांगली आणि आपल्या भावना नियंत्रणात ठेवणारे होते आणि अनियमित झोपणारी मुलं यातील काही करत नव्हते.
हे ही वाचा : https://zeenews.india.com/marathi/health/coconut-sugar-or-white-sugar-wh...
7 दिवस केला गेला लहान मुलांवर अभ्यास
या शोधात लहान मुलांना देखरेखीखाली ठेवले गेले. त्यांचा हाताला मॉनिटर लावण्यात आला आणि त्यांच्या झोपेचा वेळ आणि झोप किती छान झाली याचा रेकॉर्ड केला गेला. या मुलांना एक काम देखील दिले त्यांना एक खेळणी ठेवलेला लॉकबॉक्स दिला गेला. त्यांच्याकडे त्या बॉक्सच्या चाव्याही दिल्या आणि त्यांच्यावर लक्ष ठेवले की ते त्या बॉक्सला चावीने उघडतात की चिडचिड करून चावी फेकून देतात. जे मुलं नियमित झोप घेत होते त्यांनी चिडचिड न करतात एकाग्र होऊन बॉक्स उघडत होते. तर ज्यांची झोपेची वेळ सतत बदलत होती त्या मूलांनी चिडचिड करायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)