Best Breakfast For Losing Belly Fat: वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच योग्य आहार घेणेदेखील गरजेचे आहे. अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात आपण जेवण किंवा नाश्ता करणं सोडून देतो. पण नाश्ता न केल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते. रोज सकाळी हेल्दी नाश्ता केल्याने शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. दररोज, एक पौष्टिक नाश्ता तुम्हाला दिवसभराची उर्जा देतो. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीही मदत होते. यामुळं पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले वाटते. व चटपटीत पदार्थ टाळता येतात.
रोज सकाळी कोणते असे पाच पदार्थ आहेत जे न्याहारीसाठी बेस्ट आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही वजन आरामात कमी करु शकता. याबाबत जाणून घेऊया सविस्तर.
ओट्समध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असतात. जे दीर्घकाळापर्यंत तुमचं पोट भरलेले ठेवते. त्याचबरोबर यात कॅलरीदेखील कमी असतात. तुम्ही ओट्स दूध किंवा दहीसोबत खावू शकता. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार, ड्रायफ्रुट्स आणि फळदेखील टाकू शकता.
दलिया एक पौष्टिक आणि स्वादिष्ट्य भोजन आहे. यात प्रोटीन आणि फायबर असे दोन्ही गुण असतात. तसंच, पचनासदेखील हलके असतात. तुम्ही दलिया भाज्यांसोबत शिजवू शकता. किंवा त्यात दही टाकूनही खावू शकतात.
फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात. सकाळच्या नाश्तात फळं खाल्ल्याने तुमचं पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहिले. तसंच, तुम्हाला गरजेचे पोषक तत्वदेखील मिळतील. तुम्ही विविध फळ एकत्र करुन त्याचे सलाड बनवूनही खावू शकतात. किंवा एक संपूर्ण फळ खाऊ शकतात.
अंड्यात प्रोटीनचा मुख्य स्त्रोत असता. प्रोटीनमुळं दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते तसंच, मांसपेशीयांसाठीही फायदेशीर ठरते. तुम्ही अंडी उकडवून किंवा ऑम्लेट करुन वा भुर्जी करुन खावू शकता.
पोहे हे हलका आणि पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पचण्यास हलके असतात आणि त्यात कमी कॅलरीदेखील असतात. तुम्ही पोह्यांमध्ये भाज्या टाकू शकतात. किंवा दह्यात मिसळूनदेखील तुम्ही पोहे खावू शकता.
न्याहारीसाठी गोड पदार्थांचे सेवन करु नका. जर तुम्हाला चहा किंवा कॉफी पि्ण्याची सवय असेल तर साखर खूप कमी टाका. संतुलित आहार आणि योग्य व्यायामाने तुम्ही वजन आरामात कमी करु शकता. मात्र, कोणत्याही प्रकारचे डाएट सुरू करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)