मुंबई : आजकाल तरुणाईचा कल फिटनेसकडे आहे. फिट, हेल्दी राहण्यासाठी विविध पर्याय निवडले जातात. काहीजण जीम करतात तर काही योगासनं. झुंब्बा, डान्स, चालणे, स्विमिंग असे फिटनेसचे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण स्विमिंग करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे क्लोरीनच्या पाण्यामुळे होणारे नुकसान, इंफेक्शन टाळता येईल. म्हणून स्विमिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या.
स्विमिंग पूलमधील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात क्लोरीन मिसळले जाते. त्यामुळे स्विमिंग करण्यापूर्वी क्लोरीनचे प्रमाण जाणून घ्या. कारण क्लोरीनच्या अधिक प्रमाणामुळे त्वचासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
स्विमिंग करण्यापूर्वी ३० मिनिटे आधी आवश्यक तेवढे पाणी प्या. स्विमिंग करताना पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
स्विमिंग करताना कानात इअर प्लग घाला. त्यामुळे कानात पाणी जाणार नाही.
स्विमिंग केल्यानंतर स्वच्छ पाणी, साबण आणि शॅम्पूचा वापर करुन अंघोळ करा. त्यामुळे तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल. तसंच क्लोरीनचा शरीरावर परिणाम होणार नाही.
स्विमिंग करुन झाल्यानंतर लगेचच ड्रेस बदला. अन्यथा इंफेक्शनचा धोका वाढतो.
स्विमिंग केल्यानंतर लगेचच अंघोळ करा आणि अंघोळीनंतर लगेचच मॉश्चराईजर लावा. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज होणार नाही.